fraud


crime news- सांगली शहरातील वारणाली येथे सोन्याच्या व्यवहारात पैसे गुंतवण्याच्या (investment) आमिषाने एका महिलेला 20 लाख 90 हजारांचा गंडा घालण्यात (fraud) आला. याप्रकरणी एका महिलेविरोधात संजयनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दीपा ऊर्फ सई सुनील पाटील असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे. संगीता राजाराम जाधव (वय 36) यांनी फिर्याद दिली आहे. पाटील आणि जाधव या वारणाली येथे शेजारी राहतात. नोव्हेंबरमध्ये जाधव या दीपा हिच्या घरी गेल्या होत्या. त्यावेळी दीपाने 'सोन्याच्या व्यवहारात खूप पैसे मिळतात' असे त्यांना सांगितले.त्यानंतर त्यांचे दागिनेही घेतले. त्यातून जाधव यांना दागिने परत मिळाले शिवाय काही पैसेही मिळाले.

------------------------------------

Must Read


1) अन्यथा तुमचे तुणतुणे बंद करू, राजू शेट्टी यांनी दिला इशारा


2) सनी लिओनीवर दाखल झाला गुन्हा.....!!!


3) सरकारने शेतकऱ्यांविरोधात सेलिब्रिटींना उतरवले


------------------------------------


त्यानंतर दीपाने 'एका व्यवहारात चाळीस लाख रूपये गुंतवायचे  (investment) आहेत' असे जाधव यांना सांगितले. परतावाही चांगला मिळेल, असे सांगितले. त्यामुळे जाधव यांनी दीपाला 20 लाख 90 हजार रूपये दिले. मात्र पैसे देऊन बरेच दिवस झाल्यानंतरही तिने ते पैसे परत देण्यास नकार दिला. शिवाय जाधव यांच्या नावे चिठ्ठी लिहून आत्महत्या करण्याची तसेच सावकारीचा गुन्हा दाखल करण्याची धमकीही दिल्याचे जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार दीपा पाटील हिच्याविरोधात फसवणुकीचा (fraud) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.