crime new- ऊसतोडणी मुकादमाने वाळवा तालुक्यातील फार्णेवाडी येथील मोहन मधुकर फार्णे यांना आठ लाख रूपयांना गंडा घातला आहे. या बाबत फार्णे यांनी ईश्वरपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी बाबूराव गेणू पवार ( रा. काळेगांव हवेली, रामनगर तांडा,पो. नाळवंडी, जि, बीड) याच्या विरूद्ध फसवणूकीचा(fraud) गुन्हा नोंद केला आहे.
पवार याने २०१८-२०२९ च्या हंगामात फार्णे यांच्या कडून आकरा लाख पंचावन्न हजार रूपये नाही घेतले होते. पैकी तीन लाख ४६ हजार मजूरी वजा करून त्याच्याकडे आठ लाख नऊ हजार रूपये अद्याप येणे आहेत.
--------------------------------
Must Read
1) आरोपावर धनंजय मुंडेंचा खुलासा, म्हणाले…
2) ग्राहकांना झटका! बजेट 2021 नंतर 25 रुपयांनी वधारल्या गॅसच्या किंमती
3) SBI मध्ये खातं असेल तर KYC साठी ही कागदपत्र आवश्यक
--------------------------------
या बाबत वारंवार मागणी करूनही तो ही रक्कम देण्यासाठी टाळाटाळ करत होता. त्याने या रक्कमेचा चेकही दिला होता. तो चेक बँकेत वटला त्यानंतर फार्णे यांच्या आपली फसवणूक(fraud) झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी आज ईश्वरपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.