sports news- भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) च्या मुलावर आयपीएल लिलावात (IPL Auction 2021) बोली लावण्यात आली. 20 लाख रुपयांच्या बेस प्राईजवर अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) ला मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) विकत घेतलं. त्याआधी सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेत अर्जुन तेंडुलकरने सिनियर क्रिकेटमध्ये मुंबईकडून पदार्पण केलं. अर्जुन तेंडुलकरची क्रिकेटमध्ये एन्ट्री झाल्यानंतर त्याच्यावर आणि सचिनवर घराणेशाहीचा आरोप तसंच टीका झाली. या सगळ्या टीकेवर सचिनने पहिल्यांदाच अप्रत्यक्ष भाष्य (nepotism) केलं आहे.

खेळाडूला त्याच्या पार्श्वभूमीमुळे नाही, तर मैदानातल्या कामगिरीमुळे ओळख मिळते, असं सचिनने सांगितलं आहे. जेव्हा आम्ही ड्रेसिंग रूममध्ये प्रवेश करतो, तेव्हा तुम्ही कुठून आलात? तुम्ही देशाच्या कोणत्या भागातून आलात. तुमचं कोणासोबत काय नातं आहे, या गोष्टींना महत्त्व उरत नाही. खेळाच्या मैदानात प्रत्येकासाठी परिस्थिती सारखीच असते. इकडे कामगिरीशिवाय दुसऱ्या कोणत्याच गोष्टीने फरक पडत नाही, असं सचिन म्हणाला.

---------------------------------
Must Read

1) कोल्हापुरात रात्रीची संचारबंदी? वाचा काय म्हणाले पालकमंत्री सतेज पाटील

2) इचलकरंजीकरांसाठी आणखी एक चिंतेची बातमी...!!

3) बिनधास्त राहू नका; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा

---------------------------------

खेळ लोकांना एकत्र आणतो. तुम्ही एक व्यक्ती म्हणून तिकडे असता. टीमसाठी योगदान द्यायचं, हेच आमच्या डोक्यात असतं. मी वेगवेगळ्या शाळा आणि बोर्डाचा भाग असल्यामुळे वेगवेगळ्या प्रशिक्षकांना भेटतो, मी स्वत:ही यातून शिकतो आणि अनुभव शेयर करू इच्छितो, अशी प्रतिक्रिया सचिनने दिली. 

अनऍकेडमीचा ब्रॅण्ड ऍम्बेसेडर झाल्यानंतर सचिनने ऑनलाईन पत्रकार परिषदेमध्ये या मुद्द्यांवर भाष्य केलं. त्याने विद्यार्थ्यांना आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी आणखी जास्त मेहनत करण्याचा सल्ला दिला. स्वप्नांचा पाठलाग करा, कारण स्वप्न पूर्ण होतात. अनेकवेळा आता काहीच होऊ शकत नाही, असं वाटतं पण असं कधीच होत नाही. जास्त मेहनत केलीत तर एक दिवस लक्ष्यापर्यंत नक्की पोहोचाल, असा सल्ला सचिनने दिला.

ऑनलाईन एज्युकेशन (offline eduaction)प्लॅटफॉर्म अनऍकेडमीशी सचिनने करार केला आहे. या कराराच्या माध्यमातून सचिन फुकट ऑनलाईन कोचिंग देणार आहे. अनऍकेडमीच्या लाईव्ह इंटरॅक्टिव्ह क्लासमध्येही सचिन सामील होणार आहे. हा क्लास अनऍकेडमीवर ऑनलाईन शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फुकट असेल.

2013 साली सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. आपल्या करियरमध्ये सचिनने 200 टेस्ट, 463 वनडे आणि एक टी-20 मॅच खेळली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 100 शतक करण्याचा विश्वविक्रम सचिनच्या नावावर आहे. सचिनने टेस्टमध्ये 51 आणि वनडेमध्ये 49 शतकं केली.