ruckus-at-lucknow-bar-after-youth-fistfightcrime news - उत्तर प्रदेशच्या लखनऊमध्ये रविवारी रात्री तरुण-तरुणींमध्ये जोरदार हाणामारी झाली. एका तरुणाचा दुसऱ्या तरुणीला धक्का लागल्याने दोन गटात तुफान हाणामारी झाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मारहाणीवेळी सर्व तरुण-तरुणी दारुच्या नशेत होते. या मारहाणीचा व्हिडिओ (how to make a video viral on social media) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

लखनऊच्या विभूतीखंड येथील विकास नगरमध्ये राहणाऱ्या एका तरुणाचा हात ‘माय बार’मध्ये एका तरुणीला लागला. त्यावरुन वाद सुरू झाला आणि दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियमध्ये  (how to make a video viral on social media)मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून व्हिडिओत तरुण-तरुणी एकमेकांना बेदम मारताना दिसत आहेत. घटनेनंतर पोलिसांना फोनद्वारे माहिती देण्यात आली, पण पोलिस येईपर्यंत सर्वजण फरार झाले होते. पोलिसांनी मारहाणीचा गुन्हा नोंद केला असून पुढील कारवाई सुरू आहे. ------------------------------------

Must Read

1) हुपरीत आत्मदहनाचा प्रयत्न, घटनेचे चित्रीकरण करण्यावरून बाचाबाची

2) Nora Fatehi चा सेक्सी डान्स बघून आईने फेकून मारली चप्पल....

3) Gold Silver Price Today : सोने एवढे कसे महागले? वाचा आजचे दर

-------------------------------------

ईस्ट झोन विभूतीखंडचे सहायक पोलिस आयुक्त स्वतंत्र सिंह यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, “एक व्हिडिओ आम्हाला मिळाला आहे. त्यामध्ये काही तरुण-तरुणी माय बारच्या बाहेर मारहाण करताना दिसतायेत. पोलीस पोहोचेपर्यंत सर्व फरार झाले होते. सध्या आम्ही गुन्हा दाखल केला असून ओळख पटवून कारवाई सुरू आहे”.