ruhi movie trailer releasedentertainment center- 'धडक गर्ल' जान्हवी कपूर आणि राजकुमार राव यांच्या मुख्य भूमिका असलेला चित्रपट 'रूही' सुरुवातीपासूनच चर्चेत आहे. या चित्रपटाच्या नावावरुन सुरुवातील अनेक वाद सुद्धा झाले होते. या चित्रपटाचं नाव सुरुवातील 'रूही अफजा' असं ठेवण्यात आलं होतं पण आता ते बदलून रूही असं करण्यात आलं आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज (trailer releases) झाला असून यात संवेदनशील अभिनेता अशी ओळख असलेल्या राजकुमार रावचा वेगळाच अंदाज पाहायला मिळत आहे.

जान्हवी आणि राजकुमार यांचा 'रूही' हा चित्रपट एक कॉमेडी-हॉरर चित्रपट असून यात राजकुमार राव एका फोटोग्राफरच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरच्या सुरुवातीला एका नवविवाहितेच्या पावलांचे उलटे ठसे दिसू लागतात. गावातल्या लोकांचं असं म्हणणं असतं ती भूत आहे आणि प्रत्येक विवाह झालेल्या मुलीच्या शरीराचा ती ताबा घेते. मात्र तिचा चेहरा दाखवला जात नाही. त्यानंतर जान्हवी कपूरला म्हणजेच रूहीला किडनॅप करून जंगलातील एका घरात बंद करुन ठेवलं जातं आणि तिथून सुरू होतो चित्रपटातील थरार.--------------------------

लॉकडाऊननंतर आता चित्रपटगृहात चित्रपटाच्या प्रदर्शनाला परवानगी मिळाली आहे. राजकुमार राव आणि जान्हवी कपूर यांच्या मुख्य भूमिका असलेला 'रूही' येत्या ११ मार्चला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे हा थरार मोठ्या पडद्यावर पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. हा ट्रेलर (trailer releases)  सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर प्रेक्षकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. या चित्रपटाच्या निमित्त जान्हवी-राजकुमार ही जोडी पहिल्यांदा स्क्रिन शेअर करणार आहे.

संवेदनशील अभिनेता म्हणून ओळख असलेल्या राजकुमार रावनं या चित्रपटात थोड्या वेगळ्या धाटणीची भूमिका साकारली आहे. कॉमेडीचा तडका देण्यासाठी सिनेमात राजकुमार आणि जान्हवीसोबत वरुण शर्मा झळकणार आहे. या सिनेमात पंकज त्रिपाठी आणि अपारशक्ती खुराना यांच्यासुद्धा महत्त्वाच्या भूमिका आहेत. या सिनेमाचं दिग्दर्शन हार्दिक मेहता यांनी केलं आहे.