rohit sharma


ऑनलाइन टिम:

sports news- पहिल्या कसोटीतील लाजिरवाण्या पराभवानंतर भारतीय फलंदाजांनी दुसऱ्या सामन्याचा पहिला दिवस गाजवला. शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली हे भरवशाचे फलंदाज स्वस्तात माघारी गेले. पण काही दिवसांपासून लय हरवलेल्या रोहित शर्माला (rohit sharma) आज सूर गवसला. रोहितने टीकाकारांना दुसऱ्या कसोटीत दमदार प्रत्युत्तर दिलं. गोलंदाजांसाठी पोषक असलेल्या खेळपट्टीवर रोहितने गोलंदाजांचाच समाचार घेतला. १६१ धावांची दमदार खेळी करत त्याने क्रिकेटच्या (cricket) इतिहासात कोणालाही न जमलेला विक्रम आपल्या नावे केला.

भारताने नाणेफेक जिंकल्यावर सलामीला शुबमन गिल आणि रोहित शर्मा हे दोघे आले. गिल शून्यावर माघारी परतला. पण रोहितने मात्र दमदार खेळ सुरू ठेवला. चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहली दोघे स्वस्तात बाद झाले, पण मुंबईकर अजिंक्य रहाणेने रोहितला साथ दिली. या दोघांनी अर्धशतकी भागीदारी केली. त्यात रोहित शर्माने शतकी मजल मारली. त्याचसोबत श्रीलंका, वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड या चारही संघांविरूद्ध सर्व फॉरमॅटमध्ये शतक ठोकणारा रोहित पहिला खेळाडू ठरला.

----------------------------

Must Read

-------------------------------

रोहितने २३१ चेंडूत धडाकेबाज १६१ धावा केल्या. त्याच्या खेळीत (cricket) १८ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. घरच्या मैदानावर कमीत कमी १० कसोटी खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सरासरीच्या बाबतीत रोहितने जगात दुसरं स्थान पटकावलं. या यादीत ऑस्ट्रेलियाचे डॉन ब्रॅडमन ९८.२ च्या सरासरीने अव्वल आहेत. तर रोहितची सरासरी ८४.७ इतकी आहेत. फिरकीपटू जॅक लीचच्या गोलंदाजीवर स्वीप शॉट खेळताना रोहितचा मोईन अलीने सीमारेषेवर झेल घेतला.