rice weight loss tipsऑनलाइन टीम- 

केवळ भारतातच  नाही तर जगभरात भात हा सर्वात पॉप्युलर पदार्थ आहे आणि हा पदार्थ वेगवेगळ्या प्रकारे सर्वात जास्त खाल्ला जातो. मात्र, भाताबाबत अनेकांच्या मनात अनेक गैरसमज असतात. जसे की, भात(Rice) खाल्ल्याने वजन वाढतं (Rice and Obesity) आणि भात खाल्ल्याने ब्लड शुगर लेव्हलही(Blood Sugar Level) वाढते. त्यामुळे डायबिटीस असलेल्यांनी भात खाऊ नये असेही सांगितले जाते. याच कारणामुळे ज्यांना वजन कमी (weight loss tips) करायचं असतं ते आधी भात खाणं बंद करतात. पण खरंच भाताने वजन वाढतं(Obesity) का? चला जाणून घेऊ या प्रश्नाचं उत्तर....

भातात कार्ब्स अधिक, फायबर कमी...

तांदूळ खासकरून पांढरे तांदूळ (White Rice) रिफाइंड असतात. यात कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण अधिक असतं. यातील फायबरही भात शिजवताना नष्ट होतात. रिफायनिंगची प्रक्रियादरम्यान फायबर नष्ट झाल्याने भाताचा ग्लायसिमिक इंडेक्स वाढतं. हेच कारण आहे की, जर फार जास्त प्रमाणात भाताचं सेवन केलं तर निश्चितपणे लठ्ठपणा आणि अनेक प्रकारच्या क्रॉनिक आजारांचा धोका असतो.

------------------------------

Must Read

1) पुन्हा लॉकडाऊन? पाहा कुठे काय बंद आणि काय सुरू राहणार; नवे नियम लागू

2) IPL Auction : कोणत्या संघानं कोणाला घेतलं विकत?

3) आरोग्यमंत्री राजेश टोपे कोरोनाच्या विळख्यात..!

------------------------------

डाळ, भाजी आणि तूप घालून खावा भात

अनेक हेल्थ एक्सपर्ट आणि न्यूट्रिशिअन वजन कमी करण्यासाठी डाएटमध्ये डाळ-भात (Dal and Rice) खाण्याचा सल्ला देतात. मात्र, डायटिशिअन आणि न्यूट्रिशनिस्ट यांच्यानुसार, तांदळाच्या सिंगल पॉलिश्ड व्हरायटीचं सेवन करायला हवं. सोबतच केवळ भात खाण्याऐवजी, भातात प्रोटीन असलेली डाळ, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असलेल्या भाज्या आणि तूप घालून खावा. असं केल्याने तुमच्या शरीरालाही भातातील कार्ब्ससोबतच आवश्यक प्रोटीन आणि इतर न्यूट्रिएंट्सही मिळतील. याने वजन वाढण्याचा धोका (weight loss tips) राहणार नाही.

पोर्शन साइजवर लक्ष ठेवणं गरजेचं

भात खाल्ल्याने काही लोकांचं वजन का वाढतं याचं कारण हे आहे की, ते त्यांच्या पोर्शन साइजवर लक्ष देत नाहीत. चपाती खाताना त्या मोजणं सोपं असतं. म्हणजे तुम्ही २ चपात्या किंवा ३ चपात्या खाल्ल्या हे मोजता येतं. पण भात खाताना हे मोजता येत नाही. हे समजत नाही की, किती भात खाणं आरोग्यासाठी चांगलं राहील किंवा अडचणीचं ठरू शकतं. अशात अनेक लोक भातासोबत ओव्हरइंटिग करतात आणि त्यामुळे त्यांचं वजन वाढतं. त्यांना लठ्ठपणाची समस्या होते. त्यामुळे छोट्या प्लेटमध्ये खा. जेणेकरून तुम्ही भाताचं सेवन लिमिटेड कराल.