stomach immune systemऑनलाइन टिम :

health tips- अन्न खाल्ल्यानंतर गॅस, बद्धकोष्ठता किंवा पोट बिघडणे सामान्य बाब आहे. परंतु, अशा समस्या वारंवार झाल्यास याचा अर्थ असा आहे की तुमची पचनप्रणाली कमकुवत (stomach immune system)आहे. याची अनेक कारणे असू शकतात, त्यातील एक म्हणजे योग्य वेळेत न खाणे ही आहे. काही लोकांना टेबलवर खाण्याची किंवा काम करत असताना उभे राहून खाण्याची सवय असते. आयुर्वेदानुसार आपल्या शरीराला अन्नातील पोषकद्रव्ये शोषण्यासाठी योग्य वातावरणाची आवश्यकता आहे. म्हणून, बसूनच खावे. यामुळे आपले पोट आरामशीर राहते, जे पचन सुधारण्यास मदत करते. पचनशक्ती ( immune system) वाढविण्यासाठी काही प्रभावी उपायांबद्दल जाणून घेऊया.

बारीक घास चावून अन्न खा

लोक अनेकदा जलद खाणे खातात. त्यामुळे चांगले अन्न चर्वण होत नाही. ते सहजपणे पचण्यासाठी घास बारकाईने चावून अन्न खा. त्यामुळे पचनप्रणाली मजबूत आणि पोट व्यवस्थित राहते.

कोमट पाणी प्या

पाणी शरीरातील सर्वात आवश्यक गोष्टींपैकी एक आहे. त्याच्यामुळे आहारात उपलब्ध ऊर्जा शरीरात येते. तसेच सामान्य पिण्याच्या पाण्यापेक्षा कोमट पाणी प्यावे. त्यामुळे पचनप्रणाली मजबूत होण्यासाठी मदत करते. आपण लिंबाचे सरबत पिऊ शकता. ते पचनशक्ती मजबूत करण्यासाठी उपयुक्त आहे.

---------------------------

व्हिटॅमिनयुक्त आहार घ्या

व्हिटॅमिन-सी  (vitamin c)समृध्द अन्नाच्या सेवनाने पचनशक्ती (stomach immune system) मजबूत होते. म्हणून, आपल्या आहारात व्हिटॅमिन-सी समृध्द पदार्थांचा समावेश करा, जसे की ब्रोकोली, संत्री, किवी आणि स्ट्रॉबेरी इ. हे पचनशक्ती मजबूत करण्यात मदत करते.

जास्त खाणे टाळा

काही लोकांना सवय असते की एकदाच ते भरपूर खाऊन बसतात यामुळे अन्न पचविण्यात अडचण होते, तसेच पोट संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात. म्हणून थोडेसे खावे आणि पचविणे सोपे आहे असे पदार्थ खा. यासाठी आपण बथुआ आणि पालक घेऊ शकता जे पचनशक्ती देखील मजबूत करते.