telecom company


ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी टेलिकॉम कंपन्यांनी (telecom company) अनेक आकर्षक प्लान ऑफर केले आहेत. रिलायन्स जिओ शिवाय एअरटेल आणि वोडाफोन आयडियाकडे असे बरेच प्लान आहेत. ज्यात कमी किंमतीत डेटा आणि फ्री कॉलिंगची सुविधा मिळते. आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी तिन्ही कंपन्यांच्या प्लानसंबंधी (prepaid plan) माहिती देणार आहोत. या प्लानची किंमत १०० रुपयांपेक्षा कमी आहे. यात डेटा सोबत फ्री कॉलिंग आणि २ लाख रुपयांचा इन्शूरेन्स (insurance policy) दिला जातो.

२०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत जिओचे प्रीपेड प्लान

२०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत जिओ आपल्या युजर्संना १४९ रुपये आणि १९९ रुपयांचे प्लान ऑफर करतात. १४९ रुपयांच्या प्लानमध्ये रोज १ जीबी डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळतो. रोज १०० फ्री एसएमएस प्लानची वैधता २४ दिवसांची आहे. या प्लानमध्ये जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते. १९९ रुपयांच्या प्लानमध्ये रोज १.५ जीबी डेटा मिळतो. यात एकूण ४२ जीबी डेटा दिला जातो. २८ दिवसांच्या वैधतेसोबत अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज १०० फ्री एसएमएस दिले जातात. या प्लानमध्ये जिओ अॅप्सचे फ्री अॅक्सेस दिले जाते.

---------------------------------

Must Read

1) आमदार प्रकाश आवाडे यांच्या नेतृत्त्वाखाली आज भव्य मोटरसायकल रॅलीचा प्रारंभ

2) ...अन्यथा कोल्हापूरचा वणवा राज्यभर पेटेल

3) Propose Day : प्रपोज करण्यासाठी 'हे' फंडे वापराल तर नकाराचं टेंशन विसराल....

---------------------------------

२०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत एअरटेलचे प्लान

एअरटेल युजर्संना २०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत बेस्ट प्लान ऑफर केले जातात. कंपनीच्या १४९ रुपयांच्या प्लानमध्ये २८ दिवसांची वैधतेसोबत एकूण २ जीबी डेटा दिला जातो. अनलिमिटेड कॉलिंग बेनिफिटच्या या प्लानमध्ये विंक म्यूझिक आणि एअरटेल एक्स्ट्रिमचे फ्री अॅक्सेस दिले जाते. तसेच अॅमेझॉन प्राईम व्हिडिओचे ३० दिवसांसाठी फ्री ट्रायल दिले जाते. या प्लानमध्ये ३०० फ्री एसएमएस दिले जातात. एअरटेलचा १७९ रुपयांचा दुसरा प्लान आहे. 

यात अनलिमिटेड कॉलिंग सोबत ३०० फ्री एसएमएस आणि २ जीबी डेटा ऑफर केला जातो. प्लानची वैधता २८ दिवसांची आहे. या प्लानमध्ये सब्सक्रायबर्सला २ रुपये किंमतीचा Bharti Axa Life Insurance (insurance policy) दिला जात आहे. १९९ रुपयांच्या प्लानमध्ये एअरटेल युजर्संना रोज १ जीबी डेटा दिला जातो. २४ दिवसांच्या वैधतेसोबत अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज १०० फ्री एसएमएस दिले जातात. प्लानमध्ये प्राइम व्हिडिओचे ३० दिवसांचे फ्री ट्रायल सोबत एअरटेल एक्स्ट्रिम आणि विंक म्यूझिकचे फ्री सब्सक्रीप्शन दिले जातात.

२०० रुपयांपेक्षा कमी किमतीत वोडाफोन आयडियाचे प्रीपेड प्लान

१४८ रुपये आणि १४९ रुपये तसेच १९९ रुपयांचे प्लान आहेत. १४८ रुपयांच्या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग रोज १ जीबी डेटा आणि १०० फ्री एसएमएस दिले जातात. प्लानची (prepaid plan) वैधता १८ दिवसांची आहे. १४९ रुपयांच्या प्लानमध्ये कंपनी ३ जीबी डेटा देते. २८ दिवसांची वैधता असलेल्या या प्लानमध्ये ३०० एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंग दिली जाते. १९९ रुपयांच्या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग सोबत १ जीबी डेटा आणि १०० फ्री एसएमएस दिले जातात. या प्लानची वैधता २४ दिवसांची आहे.