reliance jioऑनलाइन टिम :

रिलायन्स जिओने (reliance jio) आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन रिचार्ज ऑफर (online mobile recharge) आणली आहे. याची सुरुवात १६ फेब्रुवारपासून करण्यात आली आहे. ही ऑफर २८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत राहणार आहे. या ऑफर अंतर्गत रिचार्ज केल्यास कॅशबॅक आणि बक्षीस यासारखे ऑफर्स मिळणार आहे. जिओच्या रिचार्जवर १०० रुपयांपर्यंत कॅशबॅक आणि १००० रुपयांपर्यंत बक्षीस दिले जाणार आहे.

पेटीएमसोबत रिचार्ज ऑफर

नवीन ऑफर अंतर्गत जर पेटीएम वरून जिओ नंबरचे रिचार्ज केल्यास १०० रुपयांपर्यंत कॅशबॅक ऑफर मिळणार आहे. ही ऑफर जिओच्या नवीन ग्राहकांसाठी पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या रिचार्जसाठी आहे. तर जुन्या ग्राहकांना १ हजार रुपयांपर्यंत बक्षीस मिळू शकते. या ऑफरचा फायदा मिळवण्यासाठी तुम्हाला पेटीएमवरून कमीत कमी ४८ रुपयांचा रिचार्ज करावा लागणार आहे. बक्षीस म्हणून मिळालेल्या कूपनचा वापर तुम्ही शॉपिंगसाठी करू शकता.

फोनपे सोबत रिचार्ज ऑफर

जर तुम्ही जिओचे नवीन ग्राहक असाल आणि तुम्ही फोनपे वरून रिचार्ज करीत असाल तर १४० रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळणार आहे. तसेच सोबत २६० रुपयांचा स्क्रॅच अँड विन रिवॉर्ड मिळणार आहे. १४० रुपये दोन भागात मिळणार आहे. पहिल्या रिचार्जवर ८० रुपयांचा आणि दुसऱ्या व तिसऱ्या रिचार्जवर ६०-६० रुपयांचा कॅशबॅक मिळणार आहे. तर जुन्या ग्राहकांना पहिल्या रिचार्जवर १२० रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळणार आहे. ही ऑफर यूपीआय आयडीवरून रिचार्ज केल्यास मिळणार आहे. फोनपेच्या या ऑफरसाठी तुम्हाला कमीत कमी १२५ रुपयांचे रिचार्ज करावे लागणार आहे.

----------------------------

अॅमेझॉन सोबत रिचार्ज ऑफर

अॅमेझॉन सोबत जिओ ऑफर केल्यास अॅमेझॉनवर (amazon) १२५ रुपयांपर्यंत बक्षीस मिळेल. नवीन आणि जुन्या दोन्ही ग्राहकांसाठी या बक्षीसचे अॅमेझॉन शॉपिंगमध्ये केले जाऊ शकते.

मोबीक्विक सोबत रिचार्ज ऑफर

मोबक्विक सोबत पहिली ऑफर १४९ रुपये किंवा त्यापेक्षा जास्त यूपीआय रिचार्जवर (online mobile recharge) केल्यास ५ टक्के कॅशबॅक मिळते. जास्तीत जास्त कॅशबॅक ५० रुपये आहे. या ऑफरचा फायदा घेण्यासाठी ग्राहकांना NJIO50 कोड टाकावा लागतो.

फ्रीचार्ज सोबत रिचार्ज ऑफर

फ्रीचार्ज सोबत रिचार्ज केल्यास ही ऑफर मिळते. फ्रीचार्जवरून जिओ नंबर रिचार्ज केल्यास ३० रुपयांचा कॅशबॅक मिळतो. जुन्या ग्राहकांना २० रुपयांचा कॅशबॅक मिळतो. ३० रुपयांचा कॅशबॅक कूपन कोड JIO30 आणि २० रुपयांच्या कूपनसाठी JIO20 आहे.