ऑनलाइन टिम:
रिलायन्स जिओ (reliance jio recharge) आपल्या ग्राहकांसाठी स्वस्त किंमतीत डेटा, कॉलिंग आणि एसएमएस सुविधा देत आहे. कंपनीने काही दिवसांपूर्वी जिओ पोस्टपेड प्लस सेवा ऑफर केली होती. कंपनीडे आपल्या जिओ फोन ग्राहकांसाठी सुद्धा जबरदस्त प्लान (online mobile recharge) आहेत. आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी जिओ फोन साठी उपलब्ध असलेल्या १५५ रुपयांच्या रिचार्ज प्लान संबंधी ही माहिती देत आहोत.
१५५ रुपयांचा जिओ रिचार्ज प्लान
जिओचा १५५ रुपयांचा रिचार्ज प्लानची वैधता २८ दिवसांची आहे. या पॅकमध्ये ग्राहकांना रोज १ जीबी डेटा मिळतो. रोज मिळणारा डेटा संपल्यानंतर स्पीड कमी होऊन 64Kbps इतकी होते. म्हणजेच ग्राहकांना एकूण २८ जीबी डेटा या प्लानमध्ये मिळतो. व्हाइस कॉलवरून आययूसी चार्ज हटवल्यानंतर जिओच्या बाकीच्या प्लानप्रमाणे या प्लानमध्ये सुद्धा एसटीडी कॉलवर पूर्णपणे फ्री आहे. म्हणजेच कोणत्याही एफयूपी लिमिट नाही. ग्राहकांना रोज १०० एसएमएस फ्री पाठवण्याची सुविधा आहे. याशिवाय, जिओ अॅप्सचे सब्सक्रिप्शन या रिचार्ज प्लानमध्ये कोणेतही अतिरिक्त शूल्क न देता ऑफर केले जाते.
----------------------------
Must Read
1)आजचे राशीभाविष शनिवार,13 फेब्रुवारी २०२१
2)२९ लाखाची ऑनलाईन फसवणूक...!!!
3) विराट कोहलीच्या नेतृत्वाबाबतची चर्चा निरर्थक- पीटरसन...!!
या शिवाय जिओ कंपनीकडे १८५ रुपये, १२५ रुपये, ७५ रुपयांचे रिचार्ज प्लान (online mobile recharge) ऑफर केले जातात. या प्लानमध्ये अनुक्रमे ५६ जीबी , १४ जीबी, ३ जीबी डेटा पॅक ऑफर केला जातो. या सर्व प्लानमध्ये अनलिमिटेड कॉल शिवाय १०० एसएमएस रोज पाठवण्याची सुविधा मिळते.