reliance jio recharge planऑनलाइन टीम- 

Reliance Jio कडे असे अनेक प्लान आहेत जे १५० रुपयांपेक्षा कमी किंमतीत येतात. कंपनीने खास जिओ फोन युजर्संसाठी असे दोन प्लान आणले आहेत. ज्यांची किंमत ७५ रुपये आणि १२५ रुपये आहे. या दोन्ही प्लानची (mobile recharge online) वैधता २८ दिवसांची आहे. आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी १२५ रुपयांच्या प्रीपेड प्लान (prepaid plan)  संबंधी खास माहिती देत आहोत. जाणून घ्या.

१२५ रुपयांचा जिओ फोन प्लान

जिओचा १२५ रुपयांच्या प्लानची वैधता २८ दिवसांची आहे. या प्लानमध्ये ०.५ जीबी रोज दिला जातो. म्हणजेच ग्राहकांना एकूण १४ जीबी डेटा मिळतो. रोज मिळणारा डेटा संपल्यानंतर याची स्पीड कमी होऊन ती 64Kbps होते.

------------------------------

Must Read

1) पुन्हा लॉकडाऊन? पाहा कुठे काय बंद आणि काय सुरू राहणार; नवे नियम लागू

2) IPL Auction : कोणत्या संघानं कोणाला घेतलं विकत?

3) आरोग्यमंत्री राजेश टोपे कोरोनाच्या विळख्यात..!

------------------------------

जिओच्या या रिचार्ज प्लानमध्ये अनलिमिटेड व्हाइस कॉलची (voice call) सुविधा दिली जाते. याशिवाय, कंपनी एकूण ३०० एसएमएस या प्लानमध्ये ऑफर करते. १५० रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या या प्लान रिचार्ज सोबत जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जाते. म्हणजेच ग्राहकांना जिओ सिनेमा, जिओ टीव्ही आणि जिओ म्यूझिक सह अन्य जिओ अॅप्स कोणत्याही शूल्काशिवाय युजर्संना दिले जाते.

याशिवाय, जिओ फोन युजर्ससाठी १८५ रुपये, १५५ रुपये आणि ७५ रुपयांचा प्लान (mobile recharge online) सुद्धा ऑफर करतो. या सर्व प्लानची वैधता २८ दिवसांची आहे. यात अनलिमिटेड कॉलिंग ऑफर दिली जाते. जिओ फोनकडून देण्यात येणारी ही ऑफर प्लान त्याचवेळी काम करतील जेव्हा जिओ सिम जिओफोनमध्ये असेल तेव्हा. त्यामुळे जिओ फोन असलेल्या युजर्संना याचा लाभ घेता येऊ शकतो.