recipe special- batata vada


ऑनलाइन टिम :

‘उपवासाचा (fast) बटाटा वडा’च्या सारणासाठीचे जिन्नस (recipe special)

 • १ किलो उकडलेले बटाटे
 • १ कच्चा बटाटा किंवा १ रताळे किसलेले
 • आले
 • हिरव्या मिरच्या(उपवासाला चालत असल्यास)
 • बारीक कापलेली कोथिंबीर
 • चवीप्रमाणे मीठ
 • साखर
 • एक चमचा लिंबू रस
 • दाण्याचा कुट
 • खवलेला ओला नारळ

‘उपवासाचा बटाटा वडा’च्या कव्हरसाठीचे जिन्नस (recipe special)

 • राजगिरा पीठ
 • शिंगाडा पीठ
 • साबूदाणा पीठ (नसले तरी चालेल)

‘उपवासाचा (fast) बटाटा वडा’ची पाककृती

 • प्रथम हिरव्या मिरच्या, आले व थोडेसे जीरे घालून वाटून घ्या. बटाटे गरम असतानाच सोलून घ्या व बारीक करा.
 • नंतर ते गार झाल्यावरच त्यात चवीप्रमाणे आल्यासह मिरचीचा ठेचा, दाण्याचा कुट, खवलेला ओला नारळ घाला.
 • नंतर त्यात चवीप्रमाणे मीठ व एक चमचा साखर घाला वर लिंबाचा रस टाका व सर्व मिश्रण हाताने एकजीव करा.
 • एकजीव झालेल्या सारणाचे तळहाताला थोडे पाणी लावून चपटे वडे थापून घ्या.
 • आता एका भांड्यात सर्व पीठे एकत्र करुन त्यात पाणी घालून सरबरीत करा.
 • त्यात थोडेसे मीठ, तिखट व किसलेला कच्चा बटाटा किंवा रताळे घाला.
 • गॅसवर कढईत तेल घालून तापवा.
 • तेल गरम होताच त्यातून एक चमचा तेल काढून सरबरीत केलेल्या पिठात टाकून ढवळा.
 • नंतर वडे तयार पिठात घोळवून तेलात तळून काढा व गरमागरम वडे खोबर्‍याच्या चटणी सोबत सर्व्ह करा.