rbi bank transactionकर्नाटकच्या डेक्कन अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) एक मोठा निर्णय घेतला आहे. आरबीआयने डेक्कन अर्बन बँकेच्या ग्राहकांना त्यांच्या बचत खात्यातून 1 हजाराहून अधिक रक्कम काढण्यावर बंदी घातली आहे. तसेच नवीन कर्ज देण्यास आणि ठेवी स्वीकारण्यावर देखील बंदी घातली आहे. हा नियम जारी केला असून आगामी 6 महिन्यांसाठी हा नियम लागू राहणार असल्याची सूचना आरबीआयने बँकेचे (bank transaction) मुख्य कार्यकारी अधिका-यांना (सीईओ) दिल्याचे म्हटले आहे.

याबाबत केंद्रीय बँकेने प्रसिद्धीपत्रकात दिलेल्या माहितीनुसार, बँकेची सध्याची आर्थिक स्थिती लक्षात घेता ठेवीदारांना सर्व बचत खाती किंवा चालू खात्यांमधून 1 हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम काढण्याची परवानगी मिळणार नाही. तसेच बँकेने ग्राहकांना कर्जाबाबत देखील माहिती दिली असून त्यासाठी काही अटी असल्याचे म्हटले आहे. आरबीआयच्या माहितीनुसार, बँकेवरील बंदीचा अर्थ बँक परवाना रद्द केला असा नाही. 

-----------------------------

Must Read

1) पुन्हा लॉकडाऊन? पाहा कुठे काय बंद आणि काय सुरू राहणार; नवे नियम लागू

2) IPL Auction : कोणत्या संघानं कोणाला घेतलं विकत?

3) आरोग्यमंत्री राजेश टोपे कोरोनाच्या विळख्यात..!

------------------------------

आता जारी केलेल्या निर्देशानुसार, बँकेची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी मदत होईल आणि व्यवहार सुरू (bank transaction) राहतील. देशात शेती आणि ग्रामीण भागात चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राज्य सहकारी संस्था कायद्यांतर्गत सहकारी बँका स्थापन केल्या आहेत. गेल्या वर्षी सरकारने घेतलेल्या निर्णयानंतर सर्व सहकारी बँका रिझर्व्ह बँकेच्या देखरेखीखाली आल्या आहेत. नियामकाने दिलेल्या माहितीनुसार, हे संपूर्ण प्रकरण 99.58 टक्के ठेवीदार ठेवी विमा आणि कर्ज हमी कॉर्पोरेशन विमा कॉर्पोरेशन (डीसीजीसी) योजनेंतर्गत आहे.