RBI Recruitment newsऑनलाइन टिम :

recruitment news- भारतीय रिझर्व्ह बँकेत (Reserve Bank of India, RBI)अनेक पदांवर भरती निघाली आहे. तरुणांना यामुळे आरबीआयमध्ये नोकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे. आरबीआयने नॉन-सीएसजीच्या अनेक जागांवर भरतीसाठी अधिसूचना काढली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार यासाठी 10 मार्चपर्यंत अर्ज करू शकतात.

महत्त्वाच्या तारखा..

ऑनलाइन अर्जाची सुरुवात - 23 फेब्रुवारी 2021

ऑनलाइन अर्जाची अंतिम मुदत - 10 मार्च 2021 संध्या. 6 वाजेपर्यंत

अर्जाची फीस भरण्याची अखेरची तारीख - 10 मार्च 2021

परीक्षेची तारीख - 10 एप्रिल 2021

----------------------------

किती असेल पगार?

लीगल ऑफिसर ग्रेड बी - 77208 रुपये प्रति माह

मॅनेजर - 77208 रुपये प्रति माह

असिस्टंट मॅनेजर (राजभाषा) - 63172 रुपये प्रति माह

असिस्टंट मैनेजर (प्रोटोकॉल आणि सिक्युरिटी) - 63172 रुपये प्रति माह

किती आहे अर्जाची फीस?

जनरल, ओबीसी, पीडब्ल्यूडी प्रवर्गासाठी - 600 रुपये

एससी, एसटी उमेदवारांसाठी - 100 रुपये

पात्रता ( recruitment news)

लीगल ऑफिसर ग्रेड बी

या पदासाठी उमेदवाराने विधी शाखेत पदवी घेतलेली असावी. यासोबत दोन वर्षांचा अनुभवही गरजेचा आहे.

मॅनेजर (टेक्निकल सिव्हिल)

या पदासाठी सिव्हिल इंजिनिअरिंग पदवीप्राप्त आणि तीन वर्षांचा अनुभव गरजेचा आहे.

असिस्टंट मॅनेजर (राजभाषा)

या पदासाठी इंग्रजी विषयाच्या शिक्षणासोबतच हिंदीमध्ये द्वितीय श्रेणीत पदव्युत्तर पदवी आवश्यक आहे.

असिस्टंट मॅनेजर (प्रोटोकॉल आणि सिक्युरिटी)

या पदासाठी उमेदवाराचे सेना/नौसेना/वायुसेनेत अधिकारी पदावरील कामाची कमीत कमी 5 वर्षांची सेवा गरजेची आहे. RBI Recruitment 2021 on Various Vacancies Read in Detail about RBI Jobs Pay Scale on Postsया पदांवरील भरतीसाठी उमेदवारांची निवड ही ऑनलाइन आणि ऑफलाइन परीक्षा तसेच मुलाखतींच्या आधारावर होणार आहे.