raj thackeraypolitics news- काही दिवसांपूर्वी पुण्यातील सोमाटणे टोल स्थानिकांसाठी बंद करावा ही मागणी घेऊन मावळवासियांनी कृष्णकुंज गाठलं होतं, फक्त दीड किलोमीटर अंतर २ टोलनाके असल्याने स्थानिकांनी या टोलवसुलीविरोधात मोर्चा उघडला होता, याबाबत मावळवासियांसाठी सर्वपक्षीय नेते एकवटले होते, टोलवसुलीविरोधात (toll collection) नागरिकांकडून तीव्र आंदोलन होणार होते, मात्र तत्पूर्वी या लोकांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची कृष्णकुंजवर जाऊन भेट घेतली होती.

हे टोलनाके बंद करावेत यासाठी शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,(CM Uddhav Thackeray) उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांचीही भेट घेतली होती परंतु, राज ठाकरेंच्या भेटीनंतर मावळवासियांचा टोलमाफीचा प्रश्न निकाली लागला आहे, त्यामुळे या सर्वपक्षीय नेत्यांनी पुन्हा एकदा भेट घेऊन त्यांचे आभार मानले आहेत. अनेक दिवस प्रलंबित असलेला प्रश्न खुद्द राज ठाकरेंनी एकाच फोनवर सोडवल्याने मावळवासियांना आनंद झाला होता, त्यांनी पुण्याचे मनसे शहराध्यक्ष अजय शिंदे आणि नेते बाळा नांदगावकर यांनी सहकार्य केल्याबद्दल आभार मानले, त्याचसोबत कृष्णकुंजच्या राजदरबारी येऊन समस्या तात्काळ सोडवल्या जातात, निर्णय झटपट लागतात असं कौतुकही या शिष्टमंडळातील सदस्य मिलिंद अच्युत यांनी केले.

----------------------------------
Must Read

1) पुन्हा लॉकडाऊनची छाया; मुख्यमंत्र्यांचा आठ दिवसांचा अल्टिमेटम

2) आजपासून आठवडाभर ‘लॉकडाऊन’

3) राज्यात २४ तासांत "इतके" करोनाबाधित वाढले

------------------------------------

लोणावळ्यातील वर्सोली आणि सोमटणे-तळेगाव टोल नाक्यांवर (toll collection) मावळवासियांकडून टोल घेण्यात येणार नाही, त्याचा फायदा MH 14 नंबरच्या गाड्या असलेल्यांना होणार आहे. मागील भेटीवेळी या सर्वपक्षीय नेत्यांनी राज ठाकरेंकडे आपलं गाऱ्हाणं मांडले होते, त्यानंतर भेटीतच राज ठाकरेंनी IRB चे अधिकारी विरेंद्र म्हैसकर यांना फोन लावत त्यांच्याकडून माहिती जाणून घेतली, म्हैसकर यांनी समस्या लवकरात लवकर सोडवतो असं राज ठाकरेंना सांगितले,  त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याशी बोलतो असं आश्वासन राज ठाकरेंनी शिष्टमंडळाला दिलं होतं, त्यानंतर काही दिवसांत हा प्रश्न मार्गी लागला. (politics news)

कोरोनाकाळात अनेक नागरिकांनी कृष्णकुंजवर येऊन राज ठाकरेंकडे स्वत:च्या समस्या मांडल्या होत्या, यात कोळीबांधव, डबेवाले, वारकरी संप्रदाय, पुजाऱ्यांचे शिष्टमंडळ, डॉक्टर्स, बँड-बँन्जो असोसिएशन अशा विविध क्षेत्रातील लोकांनी कृष्णकुंजवर गर्दी केली होती, राज ठाकरेही अनेकांच्या समस्या जाणून घेऊन तात्काळ मार्गी लावत होते, त्यामुळे या कालावधीत समस्या मांडण्यासाठी हक्काचं व्यासपीठ म्हणून कृष्णकुंजकडून लोकांनी अपेक्षा ठेवल्या होत्या.