ऑनलाइन टिम :
Crime News-याप्रकरणी अशोक शंकर जाधव (वय ५३), त्यांचा मुलगा प्रवीण (२२, रा. कैकाडी गल्ली) अशी त्यांची नावे आहेत. काल झालेल्या मारहाणीत भीमराव जाधव यांचा मृत्यू (Death) झाला होता.पोलिसातून मिळालेली माहिती अशी की, कैकाडी गल्लीतील भीमराव व अशोक जाधव यांच्यात जुन्या कारणावरुन वाद आहे. भीमराव जाधव यांचा मुलगा रणजित शौचालयाची टाकी स्वच्छ करताना त्याचे पाणी अशोक जाधव यांच्या घराच्या भिंतीवर आले. या कारणावरून रविवारी सायंकाळी भीमराव शंकर जाधव व त्यांची पत्नी, मुलगा, सून यांना सख्खा भाऊ अशोक जाधव व त्यांचा मुलगा प्रवीण या दाेघांनी काठी, दगड, विटा यांनी मारहाण (Beating) केली.
----------------------------------Must Read
1) पुन्हा लॉकडाऊनची छाया; मुख्यमंत्र्यांचा आठ दिवसांचा अल्टिमेटम
3) राज्यात २४ तासांत "इतके" करोनाबाधित वाढले
------------------------------------
या मारहाणीत भीमराव जाधव जखमी होऊन त्यांचा मृत्यू (Death) झाला होता.या घटनेनंतर पोलिसांनी शवविच्छेदनानंतर गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला होता. भीमराव यांच्या शवविच्छेदन (Autopsy) अहवालात त्यांच्या छातीला गंभीर इजा होऊन त्यांचा मृत्यू झाल्याचे पहाटे स्पष्ट झाले. पोलिसांनी खुनाचा गुन्हा (Crime Record) दाखल केला. अशोक जाधव हे वडगाव नगरपालिका कर्मचारी आहेत. दरम्यान, मुलगी चेन्नईहून आल्यानंतर भीमराव जाधव यांच्यावर आज सोमवारी दुपारी अंत्यसंस्कार (Funeral) करण्यात आहे. तपास पोलीस निरीक्षक संतोष घोळवे करीत आहे.