accident news


भरधाव डंपरने दिलेल्या धडकेत एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू (accident) झाला. हा अपघात नवले ब्रिजजवळ दोन दिवसांपूर्वी झाला आहे.रितेश संजय मिश्रा (वय 22, रा. वारजे) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी डंपर चालकावर सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रितेश हा पुण्यातील एका नामांकित महाविद्यालयात एमबीएचे शिक्षण घेत होता. तो मूळचा उत्तरप्रदेश येथील असून, तो मित्रांसोबत वारजे माळवाडी परिसरात राहण्यास होता. दरम्यान दोन दिवसांपूर्वी तो त्याच्या दुचाकीवरुन कात्रजकडून नवले ब्रिजकडे येत होता. 

------------------------------

Must Read

1) पुन्हा लॉकडाऊन? पाहा कुठे काय बंद आणि काय सुरू राहणार; नवे नियम लागू

2) IPL Auction : कोणत्या संघानं कोणाला घेतलं विकत?

3) आरोग्यमंत्री राजेश टोपे कोरोनाच्या विळख्यात..!

------------------------------

त्यावेळी भरधाव डंपरने त्याला धडक दिली. यात त्याला गंभीर मार लागला होता. यामुळे त्याचा मृत्यू  (accident) झाला. हा प्रकार समजताच सिंहगड वाहतूक विभाग व स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी डंपर चालकाला ताब्यात घेतले आहे. अधिक तपास उपनिरीक्षक काळे हे करत आहेत.