Pulwama Attack ऑनलाइन टिम:

14 फेब्रुवारी : जम्मू काश्मीरमधील पुलवामामध्ये  (Pulwama Attack) झालेल्या दहशतवादी (Terrorist) हल्ल्याला आज दोन वर्ष झाली आहेत. 14 फेब्रुवारी 2019 रोजी सर्व देश व्हॅलेंटाईन डे (Valentine's day) साजरा करत असताना दुपारी साडे तीन वाजता हा हल्ला झाला होता. जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर 2500 जवानांना घेऊन जाणाऱ्या 78 बसच्या ताफ्यावर जैश-ए-मोहम्मदच्या (Jaish e Mohammed) दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. जैशच्या दहशतवाद्यांनी स्फोटकांनी भरलेली कार सीआरपीएफच्या (CRPF) ताफ्यावर हल्ला केला. या हल्ल्यात 40 जवान हुतात्मा झाले होते. या हल्ल्यानंतर जैशच्या अतिरेक्यांकडे इतका दारुगोळा कसा आला? हा प्रश्न संपूर्ण देशात उपस्थित झाला होता.

या दहशतवादी हल्ल्याची चौकशी करणाऱ्या राष्ट्रीय सुरक्षा एजन्सीनं (NIA) मार्च 2020 मध्ये आपला अहवाल सादर केला. या अहवालात अनेक धक्कादायक गौप्यस्फोट करण्यात आले होते. पुलवामा हल्ल्यात वापरण्यात आलेलं बॉम्बचं केमिकल ई कॉमर्स साईट अ‍ॅमेझॉनवरुन (Amazon) खरेदी केलं होतं. NIA नं या प्रकरणात दोन आरोपींना अटक केली होती. त्यांच्या चौकशीतून अनेक नवी माहिती उघड झाली होती.पुलवामा हल्ल्यात श्रीनगरच्या 19 वर्षांच्या वैज उल इस्लाम आणि पुलावामा जिल्ह्यातला मोहम्मद अब्बासला मार्च 2020 मध्ये अटक करण्यात आली होती.

----------------------------

Must Read

------------------------------

 ‘बॉम्ब बनवण्यासाठी लागणारं सर्व साहित्य अ‍ॅमेझॉनवरुन खरेदी करण्यात आलं होतं. यामध्ये केमिकल, बॅटरी आणि अन्य साहित्याचा समावेश होता,’ अशी कबुली इस्लामनं दिली होती. जैश-ए-मोहम्मद या (Terrorist) दहशतवादी संघटनेसाठी आपण ही सर्व शॉपिंग (Shopping) केली असल्याचंही त्यानं मान्य केलं होतं.इस्लामनं हे सर्व साहित्य खरेदी केल्यानंतर जैशच्या दहशतवाद्यांकडे सोपवले होते. तर इस्लामसोबत अटक करण्यात आलेला दुसरा दहशतवागी मोहम्मद अब्बास यानं या आत्मघातकी हल्ल्याचे  हल्लेखोर आदिल अहमद डार, समीर अहमद डार आणि पाकिस्तानी नागरिक कामरान यांना आपल्या घरात आश्रय दिला होता. अशी माहिती NIA नं दिली होती.