ऑनलाइन टिम:

entertainment news-  बॉलिवूडची देसी गर्ल म्हणून अभिनेत्री प्रियांका चोप्रा ओळखली जाते. प्रियांका सोशल मीडिया पोस्टमुळे नेहमीच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी प्रियांकाचे ‘अनफिनिश्ड’ हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. या पुस्तकात प्रियांकाने अनेक कलाकारांचा उल्लेख केला आहे. त्यातला एक कलाकार म्हणजे बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (salman khan) . सलमानने प्रियांकाला एकदा मदत केली होती.

प्रियांकाने तिच्या पुस्तकात एका घटनेचा उल्लेख केला आहे. ही घटना प्रियांकाच्या करिअरच्या सुरुवातीला घडली होती. तेव्हा सलमान खानने तिला मदत केली होती. प्रियांकाने एका गाण्याच्या चित्रीकरणाच्या वेळची घटना सांगितली आहे. या गाण्याच्या चित्रीकरणा दरम्यान दिग्दर्शक प्रियांकाशी चुकीच्या पद्धतीने बोलला होता. तेव्हा सलमान तिच्या मदतीसाठी धावून आला होता. कोणत्याही दिग्दर्शकाच नाव न घेता प्रियांकाने या घटनेचा उल्लेख पुस्तकात केला आहे.

----------------------------

Must Read

-------------------------------

एका चित्रपटातील रोमॅंटिक गाण्याचे चित्रीकरण सुरु होते. गाणे मोठे असल्यामुळे प्रियांकाला चित्रपटात वेगवेगळे कपडे परिधान करायचे होते आणि एक एक करून ते काढायचे होते. प्रियांकाने दिग्दर्शकाला विचारले की, एक्स्ट्रा बॉडी लेअर म्हणजेच एक्स्ट्रा कपडे परिधान केले तर चालेल का? कारण तिला तिचे अंग दाखवायचे नव्हते. त्यावर दिग्दर्शक म्हणाला की तू स्टायलिस्टशी बोलून घे. तिने स्टायलिस्टला फोन करून संपुर्ण घटना सांगितली, त्यानंतर फोन दिग्दर्शकाकडे दिला, माझ्या समोर उभा असलेला दिग्दर्शक म्हणाला, “जो भी हो, चड्डियां दिखनी चाहिए. नहीं तो लोग फिल्म देखने क्यों आएंगे?” ही गोष्ट ऐकल्यावर प्रियांकाने दुसऱ्याच दिवशी तो चित्रपट सोडून देण्याचा निर्णय घेतला. (entertainment news)

प्रियांकाने तिच्या पुस्तकात पुढे लिहिले की, “माझा सहकलाकार असलेला सलमान खान जो भारतात तेव्हा आणि आजसुद्धा लोकप्रिय अभिनेता आहे, त्याने संपुर्ण परिस्थिती समजुन घेतली आणि त्याने लगेच माझी बाजू घेऊन परिस्थीत सांभाळली… जेव्हा निर्माते तिथे आले तेव्हा सलमान त्यांच्याशी बोलला आणि त्याने संपुर्ण परिस्थिती सावरून घेतली. नक्की तो काय म्हणाला हे मला नीट आठवत नाही परंतू त्यानंतर जेव्हा निर्माते माझ्याशी बोलले तेव्हा ते व्यवस्थीत पणे बोलत होते.”