pm modi


लोकसभेतील चर्चेदरम्यान खासदारांच्या मदतीसाठी २४ तास हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. परंतु, या हेल्पलाइनवर खासदारांपेक्षा सर्वसामान्यांकडून अधिक फोन येत आहेत. हेल्पलाइनवर फोन (contact number) करताना अनेक जण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची फोन नंबर मागत आहेत. अनेकांना मोदींना  (pm modi) भेटायचे आहे. अनेकांना काही सूचना करायच्या आहेत. जर तुम्हालाही पीएमचा फोन नंबर, ईमेल आयडी किंवा अन्य पद्धतीने संपर्क करायचा असल्यास या ठिकाणी आम्ही तुम्हाला खास माहिती देत आहोत.

-------------------------------------

Must Read

1) इचलकरंजीत तलवार व चाकूघेऊन फिरणार्‍यांना अटक

2) सांगली- सतत पैशांसाठी त्रास देत असल्याने केला खून

3) सांगली- मराठा नेत्यांना फिरू देणार नाही

-------------------------------------

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पर्यंत पोहोचण्याची साधी सोपी गोष्ट म्हणजे सोशल मीडिया आहे. तुम्ही मोदींच्या अधिकृत अकाउंटवरून तुम्ही तुमच्या भावना पोहोचवू शकता. पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm modi) यांचे सोशल मीडिया अकाउंट्स www.facebook.com/narendramodi

twitter.com/narendramodi

https://plus.google.com/+NarendraModi,

https://www.youtube.com/user/narendramodi

https://www.instagram.com/narendramodi हे आहेत. https://www.mygov.in/home/61/discuss/ या ठिकाणी तुम्ही तुमची तक्रार, शुभेच्छा आणि सूचना पाठवू शकतात. तसेच तुम्ही डिबेटमध्ये सहभागी होऊ शकतात. तसेच नरेंद मोदी अॅप (नमो अॅप) वरूनही तुम्ही कनेक्ट होऊ शकतात.

ईमेल द्वारे (contact number) तुम्ही पीएमपर्यंत पोहोचू शकतात. यासाठी पंतप्रधान कार्यालयाला connect@mygov.nic.in वर मेल करू शकता किंवा narendramodi1234@gmail.com वर ईमेल पाठवू शकता. जर तुम्हाला वरील सर्व प्रकारात काही अडचण येत असेल तर तुम्ही पीएम यांना पत्र लिहू शकता. वेब इनफॉर्मेशन मॅनेजर, साउथ ब्लॉक, रायसीना हिल्स, नवी दिल्ली, पिन 110011. या पत्त्यावर पत्र पाठवू शकता. जर तुम्हाला फोन नंबर किंवा फॅक्स करायचा असेल तर 011-23015603, 11-23018939, 011-23018668 वर फोन करु शकता किंवा +91-11-23019545 या 23016857 वर फॅक्स करू शकता.