ऑनलाइन टिम:
जगभरात चॉकलेटचं (Chocolate) मोठ्या प्रमाणात सेवन केलं जातं. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सगळ्यांना चॉकलेट खायला आवडतं. सध्या व्हॅलेंटाईन वीक (Valentine week) सुरु असून चॉकलेटला मोठी मागणी आहे. महिलांना देखील चॉकलेट आवडत असल्यानं या आठवड्यात चॉकलेट मोठ्या प्रमाणात विकलं जातं. अगदी दहा रुपयांपासून करोडो रुपयांचं चॉकलेट बाजारात उपलब्ध आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका कोट्यवधी रुपये किंमत असणाऱ्या चॉकलेटविषयी माहिती देणार आहोत. ली चॉकेलेट बॉक्स (Chocolate Box) असं या चॉकलेटचं नाव आहे.
महाग का असते?
या चॉकलेटवर सोन्याची (Gold) सजावट असल्यानं याची किंमत कोटींच्या घरात जाते. परंतु याला ज्वेलरी बॉक्स म्हणत नाहीत. यामध्ये खास पद्धतीनं चॉकलेटची सजावट करून विक्री केली जाते. त्यामुळे या चॉकलेट बॉक्सची किंमत मोठ्या प्रमाणात वाढते.
सोन्याच्या दागिन्यांनी चॉकलेटची सजावट
या चॉकलेट बॉक्समध्ये सोन्याच्या दागिन्यांनी चॉकलेटची (Chocolate) सजावट केली जाते, यामध्ये गळ्यातील हार, अंगठी आणि विविध प्रकारचे दागिने असतात. महत्त्वाचं म्हणजे हे चॉकलेट बॉक्स विक्रीसाठी उपलब्ध नसून सर्वात जास्त किंमत असलेल्या मिठाईमध्ये याला सर्वात वरचं स्थान आहे.
----------------------------
Must Read
1)आजचे राशीभाविष शनिवार,13 फेब्रुवारी २०२१
2)२९ लाखाची ऑनलाईन फसवणूक...!!!
3) विराट कोहलीच्या नेतृत्वाबाबतची चर्चा निरर्थक- पीटरसन...!!
किती आहे किंमत?
सोन्याचे दागिने असल्यानं या चॉकलेट बॉक्सची किंमत काही कोटींच्या घरात आहे. 15 लाख डॉलर इतकी याची किंमत असून भारतीय चलनामध्ये ही रक्कम जवळपास 10 कोटी रुपये होते. लेक फॉरेस्ट कॉन्फेक्शन्स ही कंपनी या बॉक्समधील चॉकलेट तयार करत असून यामध्ये सिमोन ज्वेलर्स सोन्याच्या सजावटीचे काम करतात.
चॉकलेट म्हणजे काय
कोको (Cocoa) बिया भाजून त्याची पावडर तयार केली जाते. यामध्ये विविध आकार देऊन चॉकलेट तयार केलं जात. विविध पदार्थांमध्ये चव येण्यासाठी देखील चॉकलेटचा वापर केला जातो.
चॉकलेटचा इतिहास
चॉकलेटचा (Chocolate) इतिहास सर्वात जुना असून सर्वात अधिक मेसो म्हणजेच मध्य अमेरिकेत कोकोचा वापर होत होता. कोलंबसच्या काळात देखील;कोकोचा वापर होत असल्याचं दिसून आलं आहे. त्यानंतर 19 व्या दशकात चॉकलेटचा वापर सुरु झाला. माया सभ्यतांमध्ये याला जादू करण्यासाठी वापरलं जात असे. 20 व्या शतकात चॉकलेटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला. यानंतर याला पॅकिंग करून विक्री करू लागल्यानं याची किंमत हळूहळू वाढत गेली.