prarthana behareentertainment news- प्रार्थना बेहरे सोशल मीडियावर (social media) खूप सक्रीय असते. ती सोशल मीडियावर फोटो व व्हिडिओ शेअर करत असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांना आगामी प्रोजेक्टबद्दल माहिती देत असते. नुकतेच प्रार्थनाने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत तिचा नवीन लूक पहायला मिळतो आहे.

प्रार्थना बेहरे हिने नुकताच इंस्टाग्रामवर (instagram)  एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिने लिहिले की, हॅप्पी हेअर डे. मला खूप आवडला नवीन लूक.


प्रार्थना बेहरेचा हा व्हिडीओ पार्लरमधील असून यात तीचा आधीचा आणि नंतरचा लूक पहायला मिळतो आहे. तिच्या या लूकला खूप पसंती मिळते आहे.

--------------------------------
Must Read

1) आरोपावर धनंजय मुंडेंचा खुलासा, म्हणाले…

2) ग्राहकांना झटका! बजेट 2021 नंतर 25 रुपयांनी वधारल्या गॅसच्या किंमती

3) SBI मध्ये खातं असेल तर KYC साठी ही कागदपत्र आवश्यक

--------------------------------

प्रार्थना बेहरेने काही दिवसांपूर्वी लंडनमध्ये छूमंतर चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले. या चित्रपटात प्रार्थना बेहरेसोबत अभिनेत्री रिंकू राजगुरू, अभिनेता सुव्रत जोशी आणि ऋषी सक्सेना मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर जोशी करत आहेत. तिथे शूटिंग करतानाचे फोटो आणि व्हिडीओ कलाकारांनी सोशल मीडियावर(social media) (instagram) शेअर केले होते.वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर छूमंतर शिवाय प्रार्थना एका हिंदी बेवसीरिजमध्ये (web series)  देखील दिसणार आहे.प्रार्थनाने आपल्या करिअरची सुरुवात छोट्या पडद्यावरुन केली. याआधी तिने 'पवित्र रिश्ता' मालिकेतून छोटा पडदा गाजवला.

त्यानंतर 'जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा' या मराठी सिनेमातून एंट्री मारत रसिकांची मनं जिंकली.कॉफी आणि बरंच काही, मिस्टर एंड मिसेस सदाचारी, मितवा, मस्का अशा विविध मराठी सिनेमात काम केलं आहे.