Prakash Awade assumes responsibility for cleaning Indira Gandhi General Hospital‘जमत असेल तर सांगा, अन्यथा मी माझ्या परीने व्यवस्था लावतो’ या दिल्या शब्दाप्रमाणे आमदार प्रकाश आवाडे यांनी जबाबदारी पेलत इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयातील स्वच्छता  कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली. त्यामुळे अस्वच्छतेच्या विळख्यात सापडलेले रुग्णालय आता चकाचक झाल्याने रुग्णांमधून समाधान व्यक्त होत आहे.

चार वर्षापूर्वी नगरपरिषदेच्या मालकीचे इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटल (आयजीएम) राज्य शासनाकडे हस्तांतर करण्यात आले. उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळून ते इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय (आयजीजीएच) झाले. टप्प्याटप्प्याने याठिकाणी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन दिल्या जात आहेत. कोरोना काळात स्वतंत्र कोविड 19 केंद्र बनलेले हे रुग्णालयात अत्यंत उपयुक्त ठरले. परंतु अद्यापही याठिकाणी स्वच्छता व साफसफाईसाठीचा कर्मचारी वर्ग नसल्याने या रुग्णालयातील स्वच्छतेचा प्रश्‍न निर्माण झाला होता.

 दैनंदिन साफसफाई होत नसल्याचे प्रत्येक वॉर्डसह अतिदक्षता विभागातही धुळ आणि कचरा साचू लागला होता. या संदर्भात तक्रारी प्राप्त झाल्यानंतर आमदार प्रकाश आवाडे यांनी प्रत्यक्ष रुग्णालयास भेट देऊन पाहणी केली असता अस्वच्छतेचा प्रकार उघडकीस आला. त्यावेळी त्यांनी थेट जिल्हा शल्यचिकित्सकांची संपर्क साधत या प्रकाराची माहिती देत ‘जमत असेल तर सांगा, अन्यथा मी माझ्या परीने यंत्रणा राबवितो’ असा इशारा दिला होता.

-----------------------------

Must Read

1) पुन्हा लॉकडाऊन? पाहा कुठे काय बंद आणि काय सुरू राहणार; नवे नियम लागू

2) IPL Auction : कोणत्या संघानं कोणाला घेतलं विकत?

3) आरोग्यमंत्री राजेश टोपे कोरोनाच्या विळख्यात..!

------------------------------

आमदारांच्या इशार्‍यानंतरही स्वच्छता प्रश्‍नी काहीच हालचाली न दिसल्याने आमदार आवाडे यांनी स्वच्छता व साफसफाई कामाचा अनुभव असलेल्या सातारा येथील रुबे अल  केअर या संस्थेच्या माध्यमातून एक महिनाभर मोफत साफसफाई व स्वच्छता करण्याची जबाबदारी स्विकारली होती. त्याची पुर्तता केली असून दररोज स्वच्छता होऊ लागल्याने रुग्णांमधून समाधान व्यक्त होत आहे.

या संस्थेच्या माध्यमातून रुग्णालयाची अंतर्गत व बाह्य आवाराची स्वच्छता केली जात आहे. स्वच्छतेसाठी आवश्यक साहित्यही संस्थेकडूनच वापरण्यात येत असून सध्या साफसफाई व स्वच्छता कामासाठी 30 कर्मचारी कार्यरत आहेत. कालपासून कामाला सुरुवात झाली असून स्वच्छतेमुळे सर्व वॉर्डसह रुग्णालयाचे बाह्यरुपही चकाचक झाले आहे. संस्थेकडून नर्स, वॉर्डबॉय, आया आदी मनुष्यबळ पुरविले जाणार असून येत्या दोन दिवसात त्याचीही पुर्तता होईल, अशी माहिती संस्थेचे सुनिल सनबे यांनी दिली.