uddhav thackeray


ऑनलाइन टिम:

crime news- बीड जिल्ह्यातील परळी येथे राहणाऱ्या पूजा चव्हाण नावाच्या एका तरुणीनं पुण्यातील वानवडी येथील एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. यानंतर आता या प्रकरणाला वेगळं वळण लाागलं आहे. ठाकरे सरकारमधील एका मंत्र्यामुळंच तरुणीनं आत्महत्या ( suicide) केल्याचा आरोप भाजपनं केला आहे. 

यातील विविध ऑडिओ क्लील सोशलवर व्हायरल (viral on social media) झाल्या आहेत. यानंतर आता राजकीय वर्तुळातही खळबळ उडालेली दिसत आहे. कारण सुरुवातीला महाविकास आघाडीतील कथित मंत्र्याचं नाव घेतलं जात होतं. परंतु भाजपच्या महिला उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी थेट वनमंत्री संजय राठोड याचं नाव घेतल्यानं खळबळ उडाली आहे. पूजा सोशल मीडियावर खूप फेमस होती. त्यामुळं याचे पडसाद तिथंही उमटल्याचं दिसत आहेत. सोशलवर देखील निरनिराळ्या चर्चा सुरू आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वनमंत्री संजय राठोड यांच्यावर करण्यात आलेल्या गंभीर आरोपांची दखल घेतली आहे. शुक्रवारी वर्षा निवासस्थानी पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडून या प्रकरणाची माहिती मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे. या प्रकरणाची त्यांनी गंभीर दखल घेतल्याचं समजत आहे.

----------------------------

Must Read

-------------------------------

या प्रकरणी आता विविध ऑडिओ व्हायरल (viral on social media) झाल्याचंही पाहायला मिळत आहेत. एक कार्यकर्ता आणि कथित मंत्री यांच्यात फोनवरून त्या तरुणीबद्दल संवाद झाल्याचं ऐकायला मिळत आहे. इतकंच नाही तर तरुणीच्या आत्महत्येनंतरही त्यांच्यात बोलणं झाल्याचं यावरून समोर येताना दिसत आहे.

आता सरकार या प्रकरणात गांभीर्यानं लक्ष देण्याची शक्यता आहे. कारण भाजपनं आता हा मुद्दा उचलून धरला आहे. इतकंच नाही तर चित्रा वाघ यांनी तर महाविकास आघाडीच्या मंत्र्याचं थेट नाव घेत उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं आहे. संजय राठोड यांनीच पुजाला आत्महत्येला परावृत्त केलं आहे असा आरोप त्यांनी केला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणी 12 ऑडिओ क्लीप्स हाती लागल्याचा दावा केला आहे. त्यांनी याच्या प्रती पोलीस महासंचालकास पाठवल्या आहेत. यावरून फडणवीसांनीही या प्रकरणी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.