pooja chavan suicide caseऑनलाइन टिम :

crime news- टिकटॉक स्टार (tiktok star) पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी (Pooja chavan suicide case) पुणे पोलिसांनी (Pune Police) आज, अरुण राठोड (arun rathod) याला ताब्यात घेतले आहे. पूजा चव्हाणच्या आत्महत्येच्या घटनेनंतर अरुण राठोड हा बेपत्ता झाला होता. अखेर पुणे पोलिसांनी अरुणला ताब्यात घेतले असून, त्याची चौकशी केली जाणार असल्याचे कळते.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण (suicide case) उघडकीस आल्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठे वादळ उठले आहे. या प्रकरणात राज्यातील मंत्र्याचे नाव आले होते. विरोधी पक्षांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणीही केली होती. तसेच संबंधित मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी केली होती. या आत्महत्या प्रकरणात अरुण राठोड नावाच्या व्यक्तीचे नाव समोर आले होते. सोशल मीडियावर त्याच्या आणि कथित मंत्र्यांमधील संवादाच्या ध्वनिफित व्हायरल झाल्या होत्या.

----------------------------

पूजाच्या (tiktok star) आत्महत्येच्या घटनेनंतर अरुण हा गायब झाला होता. अखेर पुणे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. त्याची चौकशी करण्यात येणार आहे. अरुण हा बीड जिल्ह्यातील परळी येथील दारावती तांडा येथील रहिवासी आहे. तो पुण्यात पूजासोबत असल्याचे कळते. पूजाच्या राहण्याची व्यवस्था अरुण याने केली होती असे कळते. या आत्महत्या प्रकरणात या अरूणचा काय संबंध आहे, याचा तपास करण्यात येत आहे.