याआधी स्थगित करण्यात आलेली पल्स पोलिओ (Pulse polio) मोहीम उद्या, रविवारी ३१ जानेवारी रोजी होणार आहे. जिल्ह्यातील ५ वर्षांखालील ३ लाख २३ हजार ५४६ बालकांना डोस देण्यात येणार आहे.सकाळी ८ ते सायंकाळी ५ या कालावधीत कोल्हापूर शहर व जिल्ह्यातील २४१६ बुथवर डोस दिले जाणार आहेत. यासाठी ६४४७ आरोग्यसेवक, पर्यवेक्षक आणि वरिष्ठ आरोग्य अधिकारी नियोजनामध्ये आहेत. ७०६ मोबाईल पथके असून ऊस कामगारांच्या वस्तीपासून ते रस्त्याची कामे करणाऱ्यांच्या पालापर्यंत ही पथके जाऊन डोस देणार आहेत. २९७ ट्राझिंट पथके असून रेल्वे स्टेशन, बसस्थानकांवर ती तैनात करण्यात येतील.

---------------------------------

Must Read

1) महाराष्ट्रातील आणखी एका बँकेचा परवाना रद्द, RBI ची मोठी कारवाई

2) “शिवसेनेच्या लोकांना महाराष्ट्रात दादागिरी करण्याचं लायसन्स मिळालं आहे का?”

3) Bigg Boss14 :- राखी सावंतचा बचाव करणं सलमानला पडलं भारी

---------------------------------

डोस दिल्यानंतर दुसऱ्याच दिवसांपासून ३०९६ पथकांच्या माध्यमातून घरोघरी भेटी देऊन फेरसर्वेक्षण करण्यात येणार असून कोणाला डोस मिळाला नसेल तर त्याची खात्री करून तो देण्यात येणार आहे. यासाठी अंगणवाडी कर्मचारी, आशा वर्कर यांचे सहकार्य घेण्यात येणार आहे.

- कोल्हापूर महापालिका क्षेत्रातील लाभार्थी बालके ४८,६३८

- नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रातील लाभार्थी ५३,८४६

- ग्रामीण भागातील लाभार्थी २,२१,०६२

= एकूण ३, २३,५४६

पल्स पोलिओ मोहिमेची तयारी झाली असून डोसही शीतकरण साखळीतून पोहोच करण्यात येत आहेत. पालकांनी रविवारी न चुकता आपल्या बालकांना डोस देऊन त्यांच्या आरोग्याबाबत पूर्वदक्षता घ्यावी.