Sunny Leone


बॉलिवूडची बेबी डॉल असलेली सनी लिओनी (actress) आपल्या अदांनी नेहमीच चाहत्यांना घायाळ करत असते. तिच्या बोल्ड फोटोंमुळे सनी कायम चर्चेत असते. आताही सनी चर्चेचा विषय झाली आहे परंतु, यावेळेस मुद्दा थोडा वेगळा आणि किचकट आहे. खरं सांगायचं तर, सनीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल (Filed a crime) करण्यात आला आहे. ज्यामुळे सनीला पोलीस चौकशीला सामोरे जावे लागले.

सनीने (actress) कोचीमध्ये दोन कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे कबुल केले होते परंतु, तिथे न गेल्यामुळे हा प्रकार घडला. सनीला कोची येथे होणाऱ्या दोन मोठ्या कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी २९ लाख रुपये देण्यात आले होते. परंतु, काही वैयक्तिक कारणांमुळे ती तेथे जाऊ शकली नाही. ज्यानंतर कार्यक्रमाशी संबंधित अधिकाऱ्यांनी सनीविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. केरळ पोलिसांकडून यासंदर्भात सनीची चौकशी करण्यात आली ज्यात तिने तिची बाजू मांडली.

-------------------------------

Must Read

1)कबनूर परिसरातील सात वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार

2)UPSCच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

3)सांगली मुकादमकडून ८ लाखाला गडा

--------------------------------

तक्रारदाराने सांगितल्याप्रमाणे, सनी लिओनीने त्यांच्या दोन कार्यक्रमांना हजेरी लावण्याचं कॉन्ट्रॅक्ट केलं होतं जे २९ लाखांचं होतं आणि कार्यक्रमाचे अर्धे पैसे घेऊनही सनी तेथे उपस्थित राहिली नाही. त्यामुळे काँट्रॅक्टचे पैसे सनीने परत करावेत, असं त्यांचं म्हणणं होतं. त्यावर सनीच्या वकिलांनी सांगितलं, 'कॉन्ट्रॅक्ट १२ लाख रुपयांचं झालं होतं आणि ते पैसे कंपनीला परत करण्यात आले आहेत. आता सनीकडे काँट्रॅक्टचे कोणतेही पैसे नाहीत.'

सनी सध्या केरळमध्ये तिच्या सुट्ट्या अनुभवत आहे. तिने केरळ पोलिसांसमोर तिची बाजू मांडताना म्हटलं, 'करोनाच्या महामारीमुळे ती या कार्यक्रमांना उपस्थित राहू शकली नाही. याआधी करोनामुळेच या कार्यक्रमांना ५ वेळा पुढे ढकलण्यात आलं होतं ज्यासाठी कार्यक्रमाचे आयोजक जबाबदार आहेत.