ऑनलाइन टिम :
Crime News - इचलकरंजी कारवाईसाठी गेलेल्या पोलिस पथकावर दहशत (Panic) निर्माण करत थेट वर्दीवरच हात टाकण्याचा प्रकार शहरात घडला. त्यामुळे खाकीचा धाक कमी होऊन अवैध व्यावसायिकांसह (illegal traders) गुन्हेगारी (Crime) पुन्हा डोकेवर काढू लागली की काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे. तर गेल्या काही महिन्यापासून शहर परिसरातील गुन्हेगार व गुन्हेगारांच्या कारवायांचा वाढणारा आलेखही चिंतेत
टाकणारा ठरत आहे. दोन वर्षापूर्वी कोल्हापूरात अवैध व्यवसायाविरुध्द कारवाई करण्यासाठी गेलेल्या पथकातील अधिकाऱ्यांच्या वर्दीलाच हात घालण्यासह पोलिसांचे शस्त्र हिसकावण्यापर्यंत व्यावसायिकांची मजल गेली. त्यावेळी तत्कालीन पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी संपूर्ण जिल्ह्यातील गुन्हेगारांसह अवैध व्यवसायाची (illegal traders) पाळेमुळेच उखडून टाकली. तसाच काहीसा प्रकार गेल्या काही दिवसापूर्वी शहरात घडला. त्यामुळे वर्दीला आव्हान देणार्याविरुष्द पोलिसांची भूमिका गुलदस्त्यातच असल्याचे दिसून येत आहे. सरकारी कामात अडथळा असा गुन्हा दाखल करुन अटकेची कारवाई करुन धन्यता मानली जात आहे.
----------------------------
Must Read
1)आजचे राशीभाविष बुधवार ,17 फेब्रुवारी २०२१..!!
2)इचलकरंजी युवकावर खूनी हल्ला...!!
3)कोल्हापुरात 100 एकरमध्ये आयटी पार्क उभारणार : उद्योगमंत्री..?
वस्त्रोद्योगाचे (textile industry) प्रमुख केंद्र असलेल्या बखनगरीतील कायदा, सुव्यवस्था गेल्या तीन वर्षापासून मोका अंतर्गत कारवाईमुळे अबाधित होती. परंतु काही महिन्यांपासून शहरात पुन्हा वाढत्या गुन्हेगारी कारवायांमुळे नागरिकांत धास्ती निर्माण होत चालली आहे. खून (Murder), खूनाचा प्रयत्न, अत्याचार चोरी, अवैध व्यवसाय, फसवणूक आदींसह विविध गुन्ह्यांची मालिका सुरु झाली आहे. मोका सारख्या कारवाया करुन शहरातील सुमारे १५० पेक्षा अधिक जणांवर कारवाई (Action)करण्याचे धाडस तत्कालीन अधिकाऱ्यांनी दाखविले. त्यामुळे शहरातील गुन्ह्यांचा आलेख घसरला होता. परंतु सदर अधिकाऱ्यांच्या बदलीनंतर काही महिन्यांपासून गुन्ह्यांचा आलेख पुन्हा वरच्या बाजूने सरकत चालला आहे. पोलिसांकडून विविध प्रकारच्या कारवाया वेळोवेळी करण्यात येत असल्या तरी खाकीचा धाक मात्र संपुष्टात येत असल्याचे दिसून येत आहे.
अवैधपणे दारु विक्री (Illegal sale of liquor) व शस्त्र बाळगले असल्याच्या कारणावरुन कारवाईसाठी गेल्यानंतर लखन उर्फ फिरोज महमद मोकाशी (वय ३२) याची थेट पोलिसांना आव्हान देत एका कर्मचाऱ्याचा शर्ट फाडण्यापर्यंत मजली गेली. त्यामुळे पोलिसांच्या वर्दीलाच हात लावण्यापर्यंत संशयितांचे (suspects) धाडस वाढले आहे की खाकीचा धाक कमी झाला? असा सवाल उपस्थित केला जात आहे. अशा प्रवृत्तींना पाठीशी न घालता वेळीच कठोर कारवाई केल्यास शहरातील गुन्हेगारी मोडीत काढण्यास वेळ लागणार नाही. तेव्हा वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन वस्त्रनगरीत वाढणाऱ्या गुन्हेगारीचा आलेख कमी करावा, अशी मागणी शहरवासियांतून होत आहे.