ऑनलाइन टिम :
entertainment center- अभिनेत्री मलायका अरोरा (malaika arora) नेहमी तिचा कुत्रा कॅस्परसोबत दिसते. कधी मलायका घरात त्याच्यासोबतचे फोटो शेअर करत असते तर कधी त्याच्यासोबत वॉक करताना दिसते. मलायकाचे कॅस्परवर किती प्रेम आहे, हे सांगायला नको. ते तिच्या पोस्टमधून (instagram post) पहायला मिळते. आता मलायका अरोराने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे आणि त्यात ती कॅस्परसोबत दिसते आहे. या फोटोच्या माध्यमातून तिने कॅस्पर सहा वर्षांचा झाला असल्याचे सांगितले आहे.
मलायका अरोराने कॅस्परचा बर्थडे नुकताच साजरा केला आणि केक कटिंगदेखील केला. कॅस्परचा मलायका अरोराचा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल (instagram post) होताना दिसत आहे. या फोटोतून मलायकाचा कॅस्परवर किती जीव आहे, हे समजते आहे.
----------------------------
Must Read
1) आजचे राशीभाविष बुधवार ,17 फेब्रुवारी २०२१..!!
2) वस्त्रनगरीतील गुन्हेगारीपुढेपोलिस हतबल..?
3) कोल्हापूर : किणी टोल नाक्यावर फास्टॅगसाठी वाहनांच्या रांगा
मलायका अरोराने आपल्या डान्सच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये (bollywood) आपले स्थान निर्माण केले आहे. छैंया छैंया आणि मुन्नी बदनाम यासारख्या सुपरहिट गाण्यातून तिने चांगलीच लोकप्रियता मिळवली आहे. ती डान्ससोबत आपल्या लूक्स आणि स्टाइलने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. सध्या मलायका अरोरा परीक्षक म्हणून इंडियाज बेस्ट डान्सर शोमध्ये दिसते आहे.
बॉलिवूडचे लव्ह बर्ड्स मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांनी अगदी खुल्लमखुल्ला जगासमोर आपले नाते मान्य केले आणि तेव्हापासून दोघांच्याही प्रेमाला उधाण आले. प्रेम व्यक्त करण्याची एकही संधी मलायका व अर्जुन सोडत नाहीत. लोक काय म्हणतील, याची पर्वा न करता दोघेही एकमेकांवरचे प्रेम व्यक्त करतात.