ऑनलाइन टिम :
पेट्रोल व डिझेलच्या दरात (petrol diesel price today) गेल्या काही दिवसांपासून दररोज वाढ होत आहे. आज सलग ८ व्या दिवशी पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. पॉवर पेट्रोल (oil company) शंभरीपर्यंत पोहचले आहे.
पुण्यातील पेट्रोलचा दर मंगळवारी ९५.३९ रुपये लिटर होता़ आज २४ पैशांनी वाढून तो आज ९५.६३ रुपये लिटर झाला आहे. तसेच डिझेलचा दर मंगळवारी ८५.०४ रुपये होता़ त्यात आज २६ पैशांची वाढ होऊन डिझेलचा प्रति लिटर दर ८५.३० रुपये इतका झाला आहे. त्यावेळी पॉवर पेट्रोलमध्ये २४ पैशांनी वाढ होऊन ते ९९.३१ रुपये प्रति लिटर झाले असून अशीच भाववाढ सुरु राहिली तरी पुण्यात दोन दिवसात पॉवर पेट्रोल (petrol diesel price today) शंभरी ओलांडण्याची शक्यता आहे.
----------------------------
Must Read
1) आजचे राशीभाविष बुधवार ,17 फेब्रुवारी २०२१..!!
2) वस्त्रनगरीतील गुन्हेगारीपुढेपोलिस हतबल..?
3) कोल्हापूर : किणी टोल नाक्यावर फास्टॅगसाठी वाहनांच्या रांगा
परभणी, नांदेड सह अनेक शहरांमधील पॉवर पेट्रोलचे दर शंभराच्या पुढे गेले आहे. मध्य प्रदेशात देशात सर्वाधिक कर पेट्रोल, डिझेलवर असल्याने तेथे साधे पेट्रोलने आताच शंभरी पार केली आहे.