petrol diesel price todaypetrol diesel price today- पेट्रोल, डिझेलच्या भाववाढीची घोडदौड आज ९ व्या दिवशी कायम राहिली असून अनेक ठिकाणी पेट्रोलने ९६ रुपये पार केले आहे तर पॉवर पेट्रोलने शंभरी गाठली आहे.

गुरुवारी सलग ९ व्या दिवशी पेट्रोलच्या दरात ३२ पैशांनी वाढ होऊन पुण्यात पेट्रोलचा दर प्रति लिटर ९५.९५ रुपये इतका झाला आहे. त्याचवेळी डिझेलच्या दरात ३३ पैशांनी वाढ होऊन डिझेलचा दर ८५.६३ रुपये प्रति लिटर झाला आहे. पॉवर पेट्रोलच्या (petrol diesel price today) दरात ३२ पैशांनी वाढ होऊन ते पुण्यात ९९.६३ रुपये प्रति लिटर झाले आहे.

देशात अनेक ठिकाणी पेट्रोलच्या दराने शंभरी पार केली आहे. पेट्रोल, डिझेलच्या दरात होत असलेल्या भाववाढीमुळे वाहतूकदारांनी त्यांच्या भाड्यांमध्ये आता वाढ करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे सर्व प्रकारची वाहतूक महाग झाली आहे.

----------------------------