petrol diesel price today


ऑनलाइन टिम :

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमती (petrol diesel price today) सातत्याने वाढत आहेत. आज पेट्रोल डिझेलचे दर 29-38 पैशांनी वाढले आहेत. या वाढीनंतर आज देशातील अनेक शहरात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती रेकॉर्ड स्तरावर आहेत. मध्य प्रदेशमधील भोपाळमध्ये एक्सपी पेट्रोलचे भाव प्रति लीटल 100 रुपयांच्या पलीकडे आहेत. 

महाराष्ट्रातीलही अनेक शहरात पेट्रोलचे दर शंभरीच्या जवळ पोहोचले आहेत. मुंबईमध्ये पेट्रोलचे दर 95.75 रुपये प्रति लीटर आहेत. तर डिझेलचे दर 86.72 रुपये प्रति लीटर आहेत. त्यामुळे सामान्य मुंबईकरांसाठी इंधनाचे भाव आवाक्याबाहेरील आहेत. नागपूर, कोल्हापूर नाशिक, पुणे या महत्त्वाच्या शहरातही इंधनाचे भाव चढेच आहेत.

दिल्लीमध्ये देखील पेट्रोल डिझेलच्या (petrol diesel price today) किंमतीत वाढ झाली आहे. दिल्लीमध्ये पेट्रोल डिझेलच्या किंमती अनुक्रमे 89.29 रुपये प्रति लीटर आणि 79.70 रुपये प्रति लीटर आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात पुन्हा एकदा तेजी पाहायला मिळते आहे. सोमवारी लंडन क्रूड ऑइल एक्सचेंजमध्ये सुरुवातीच्या सत्रात WTI क्रूडची किंमती 0.69 डॉलरने वाढून 60.16 डॉलर प्रति बॅरल झाल्या आहेत. ब्रेंट क्रूडचे दर देखील 0.87 डॉलर प्रति बॅरलने वाढून 63.30 डॉलर झाल्या आहेत.

--------------------------

रोज सकाळी सहा वाजता बदलते किंमत

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अबकारी शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी चलनांच्या आधारावर आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये कच्च्या तेलाच्या किंमती काय आहेत, या आधारावर रोज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल होत असतात.

अशाप्रकारे तपासा पेट्रोल-डिझेलचे नवे दर

पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर तुम्ही एसएमएस (SMS)च्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. त्याचप्रमाणे देशातील HPCL, BPCL आणि IOC या तीन तेल विपणन कंपन्या सकाळी 6 नंतर पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जारी करतात. नवीन दरांसाठी आपण वेबसाइटला भेट देऊन माहिती मिळवू शकता. तसंच आपण मोबाइल फोनवर SMS द्वारे दर तपासू शकता.