movie trailer the girl on trainबॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा सध्या तिचा  मोस्ट अवेटेड सिनेमा 'द गर्ल ऑन द ट्रेन'मध्ये बिझी आहे. सिनेमाचा ट्रेलर समोर आला आहे. 'द गर्ल ऑन द ट्रेन' सिनेमाचा ट्रेलर (movie trailer) रिलीज होताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. यामागील कारण म्हणजे पहिल्यांदाच परिणीती चोप्रा अशा एका अवतारात दिसली आहे ज्यात तिची भूमिका गंभीर दाखवण्यात आली आहे. आतापर्यंत अनेक लाख लोकांनी हा ट्रेलर पाहिला आहे. 

--------------------------------
Must Read

1) आरोपावर धनंजय मुंडेंचा खुलासा, म्हणाले…

2) ग्राहकांना झटका! बजेट 2021 नंतर 25 रुपयांनी वधारल्या गॅसच्या किंमती

3) SBI मध्ये खातं असेल तर KYC साठी ही कागदपत्र आवश्यक

--------------------------------


ट्रेलर (movie trailer) पाहिल्यावर हे लक्षात येतं की या सिनेमात परिणीती एका अशा मुलीची भूमिका साकारत आहे जिने तिची स्मरणशक्ती गमावली आहे आणि स्मरणशक्ती गमावण्यापूर्वीच तिच्यावर एका मुलीची हत्या केल्याचा आरोप केला जातो आहे. सिनेमात बराच सस्पेन्स असणार आहे.  'द गर्ल ऑन द ट्रेन'चे शूटिंग गेल्या वर्षीच पूर्ण झाले होते. परिणीती चोप्राचा हा सिनेमा थिएटरऐवजी नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. हा सिनेमा 26 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

परिणीती यात एका अंडरकव्हर एजंटची भूमिका साकारणार आहे. तिच्यासह यात अदिती राव हैदरी, कृती कुल्हारी आणि अविनाश तिवारी असतील. 'द गर्ल ऑन द ट्रेन' मिस्ट्री-थ्रिलर सिनेमा आहे. हा याच नावाने आलेल्या हॉलिवूड सिनेमाचा रिमेक आहे.