oppo smartphone specificationssmartphone specifications- ‘ओप्पो इंडिया’चा गेल्या वर्षी लाँच झालेला बजेट स्मार्टफोन OPPO A15s आता भारतात अजून एका व्हेरिअंटमध्ये लाँच झाला आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये OPPO A15s हा फोन केवळ 4 जीबी रॅम आणि 64जीबी स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच झाला होता. आता हा स्मार्टफोन 4 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजसह लाँच झाला आहे. OPPO A15s हा स्मार्टफोन म्हणजे OPPO A15 स्मार्टफोनचा (oppo smartphone) अपग्रेडेड व्हर्जन आहे.

OPPO A15s स्पेसिफिकेशन्स : (smartphone specifications)

OPPO A15s स्मार्टफोनमध्ये (oppo smartphone) ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअपसोबत 3डी कर्व्ह्ड बॉडी आहे. अ‍ॅमेझॉन इंडियाच्या वेबसाइट किंवा रिटेल स्टोअर्समधून हा फोन खरेदी करता येईल. ओप्पो A15s मध्ये 6.52 इंचाचा एचडी+ IPS LCD डिस्प्ले असून Mediatek Helio P35 प्रोसेसर आहे. फोनमध्ये 4230mAh क्षमतेची बॅटरी आहे. ColorOS 7.2 वर कार्यरत असणाऱ्या अँड्रॉइड 10 वर आधारित या फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. यात प्रायमरी कॅमेरा 13 मेगापिक्सेलचा आणि 2-2 मेगापिक्सेलचे मॅक्रो लेन्स आणि डेप्थ सेन्सर आहे. याशिवाय सेल्फीसाठी 8 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेराही आहे. नाइट मोड, टाइम लॅप्स, स्लो-मोशन आणि AI ब्युटिफिकेशनचा पर्यायही कॅमेऱ्यात मिळेल. तर, कनेक्टिव्हिटीसाठी यामध्ये Wifi, ब्लुटूथ, जीपीएसचा समावेश आहे.

--------------------------------
Must Read

1) आरोपावर धनंजय मुंडेंचा खुलासा, म्हणाले…

2) ग्राहकांना झटका! बजेट 2021 नंतर 25 रुपयांनी वधारल्या गॅसच्या किंमती

3) SBI मध्ये खातं असेल तर KYC साठी ही कागदपत्र आवश्यक

--------------------------------

OPPO A15s किंमत:

OPPO A15s स्मार्टफोनच्या आधीच्या व्हेरिअंट म्हणजे 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेजची किंमत 11,490 रुपये आहे, तर 4 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 12,490 रुपये ठेवण्यात आली आहे. नवीन व्हेरिअंट डायनॅमिक ब्लॅक आणि फॅन्सी व्हाइट अशा दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे. तर, जुन्या व्हेरिअंटमध्ये हा फोन डायनॅमिक ब्लॅक, फॅन्सी व्हाइट आणि रेन्बो सिल्वर अशा तीन कलरच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असेल.