oneplus products


प्रीमियम स्मार्टफोन (smartphone) बनवणारी कंपनी वनप्लस OnePlus ने युजर्ससाठी एक जबरदस्त ऑफर आणली आहे. कंपनीने आपल्या युजर्ससाठी OnePlus Band Power Music Bundle ची घोषणा केली आहे. ज्यात जर तुम्ही एकत्र OnePlus Band, OnePlus Band Strap (Navy किंवा Tangerine Gray), OnePlus Power Bank (Black आणि Green) आणि OnePlus Buds Z (White किंवा Gray) खरेदी केली तर या किंमतीत १० डॉलर म्हणजेच ७०० रुपयांची बचत करता येऊ शकते.

किती फायदा

लिमिटेड ऑफर साठी आणलेल्या वनप्लसच्या या जबरदस्त ऑफर मध्ये वनप्लस फिटनेस बँड, वनप्लस बँड स्ट्रॅप, वनप्लस पॉवर आणि वनप्लस बड्सला OnePlus  Band Power Music Bundle अंतर्गत केवळ ८७ डॉलर म्हणजेच ६ हजार २९६ रुपयात खरेदी करता येऊ शकते. तसेच वनप्लसच्या या प्रोडक्ट्सला वेगवेगळे खरेदी केले तर तुम्हाला एकूण ९७ डॉलर म्हणजेच ६ हजार ९९६ रुपये द्यावे लागतात. त्यामुळे ही जबरदस्त ऑफर आहे. एकत्र खरेदी केल्यास कमी किंमतीत हे प्रोडक्ट्स खरेदी करता येऊ शकतात.

-----------------------------

Must Read

1) पुन्हा लॉकडाऊन? पाहा कुठे काय बंद आणि काय सुरू राहणार; नवे नियम लागू

2) IPL Auction : कोणत्या संघानं कोणाला घेतलं विकत?

3) आरोग्यमंत्री राजेश टोपे कोरोनाच्या विळख्यात..!

------------------------------

प्रोडक्ट्सचे फीचर्स पाहा

वनप्लसच्या या प्रोडक्टच्या फीचर्समध्ये OnePlus Band कंपनीचा हा पहिला फिटनेस बँड आहे. ज्यात अमोलेड डिस्प्ले, मल्टी स्पोर्ट्स मो, ब्लड ऑक्सीजन मॉनिटर, एक्टिविटी ट्रॅकर, स्लीप मॉनिटर आणि हार्ट रेट मॉनिटर सह खूप सारे फीचर्स दिले आहेत. जर फिटनेस बँड खरेदी करीत असाल तर तुम्हाला २ हजार ४९९ रुपये द्यावे लागतात. तर OnePlus Power Bank मध्ये 10,000mAh ची बॅटरी दिली आहे. जी 18W फास्ट चार्जिंग सपोर्ट सोबत येते. तर OnePlus Buds Z TWS हा वनप्लसचा सर्वात स्वस्त आणि सर्वात पॉप्यूलर वायरलेस ईयरफोन आहे.