ऑनलाइन टिम :
इंधन दरवाढीबरोबर (fuel price) घरगुती सिलिंडरच्या दरवाढीचा मार ग्राहकांना सहन करावा लागत आहे. दरम्यान, घरगुती सिलेंडरवरील मिळणारे अनुदानही केंद्र सरकारने टप्प्याटप्प्याने कमी करीत २७० वरून थेट ४० रुपयांपर्यंत खाली आणले आहे. त्यामुळे येत्या काळात हे अनुदानच बंद होणार असल्याचे चित्र दिसत आहे.
गेल्या काही दिवसापासून इंधनाच्या दराप्रमाणेच घरगुती सिलिंडरचेही दर वर-खाली होत असतात. त्यामुळे अनुदानाच्या रकमेतही फरक जाणवत असतो. सिलेंडरचे नवे दर महिन्याच्या एक तारखेला येत असतात. मात्र फेबुवारीत अर्थसंकल्प असल्याने केंद्र सरकारने सिलिंडरचे नवे दर चार फेब्रुवारीला जाहीर केले आणि त्यामध्ये थेट २५ रुपयांची वाढ केली.
----------------------------
Must Read
1) आजचे राशीभाविष बुधवार ,17 फेब्रुवारी २०२१..!!
2) वस्त्रनगरीतील गुन्हेगारीपुढेपोलिस हतबल..?
3) कोल्हापूर : किणी टोल नाक्यावर फास्टॅगसाठी वाहनांच्या रांगा
याच चालू महिन्यात (fuel price) पुन्हा ५० रुपयांची वाढ केली. त्यामुळे फेबुवारी माहिन्यात ७५ रुपयांची दरवाढ झाली. तसेच गॅस सिलेंडरवरील अनुदानाचा कोटा सरकारने अर्थसंकल्पात कमी केल्याने ग्राहकांना मिळणारे अनुदानही कमी येऊ लागले आहे. सध्या एका विना अनुदानित सिलिंडरसाठी ८२१ रुपये मोजावे लागत असून त्यावर केवळ ४० रुपये अनुदान ग्राहकांच्या बँक खात्यामध्ये (bank account) जमा होत आहे. त्यामुळे अनुदानित सिलेंडर ७८१ रुपयांचे पडत आहे.
दरम्यान, गतवर्षी ऑक्टोबर महिन्यात सिलिंडरचे दर ६४६ होते त्यावर ४० रुपये अनुदानाच्या स्वरूपात मिळत होते. गेल्या सात महिन्यात सिलिंडरची दरवाढ टप्प्याटप्प्याने झाली मात्र अनुदान ४० रुपयेच मिळत आहे.