Lockdown again in Maharashtra?


 

ऑनलाइन टिम :

राज्यात पुन्हा एकदा कोरोना (Covid-19) रुग्णसंख्या वाढू लागली आहे. अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार विभागवार आढावा बैठका घेत आहेत. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे हेसुद्धा उपस्थित होते. बैठकीनंतर पत्रकार परिषदेत (press conference) बोलताना दोन्ही मंत्र्यांनी राज्यातील कोरोना स्थितीवरही भाष्य केले व एकप्रकारे धोक्याचा इशाराच दिला.राज्यात गेले काही दिवस नवीन बाधितांची संख्या वाढत आहे. यावेळी अजित पवार आणि राजेश टोपे या दोघांनीही कठोर निर्णय घेण्याचे संकेत दिले. रुग्णांची ही वाढती संख्या चिंताजनक आहे. 

त्यामुळे गरज भासल्यास पुन्हा कठोर निर्णय घ्यावे लागतील, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. सध्या कुणीच मास्क वापरत नाही, असे दिसून येत आहे. ही बाब अत्यंत घातक आहे. याची आपल्याला मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, असा इशाराच अजित पवार यांनी दिला. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना मी उद्या भेटणार आहे.

--------------------------

या बैठकीत कोरोना संदर्भात (Covid-19)  कदाचित कठोर निर्णय घेतले जातील, असेही अजित पवारांनी नमूद केले. कोरोनामुळे शिवजयंती (Shiv Jayanti) साधेपणाने साजरी करण्याचे आवाहन आम्ही केले आहे. तरीही काही लोक यात नाहक राजकारण करत असल्याची टीका अजित पवार यांनी याबाबत विचारलेल्या प्रश्नावर बोलताना (press conference) केली. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांसाठीही नियमावली लागू केली पाहिजे. राजेश टोपे यांनी तर यावेळी थेट लॉकडाऊनचेच (Lockdown) संकेत दिले. कोरोना संसर्गजन्य परिस्थितीत नागरिकांनी नियम (Rules) पाळणे आवश्यक आहे, अन्यथा लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय उरेल आणि लोकहितासाठी तो कठोर निर्णय घेतला जाईल, असे टोपे यांनी ठामपणे सांगितले.