बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री (Bollywood actress) आणि डान्सर (Dancer) नोरा फतेही (Nora fatehi) आजकाल सोशल मीडियावर खूपच धुमाकूळ घालत आहे. ती नेहमीच तिच्या चाहत्यांसाठी काही ना काही शेअर करत असते. तिच्या बहुतांशी पोस्ट या डान्स करतानाच्या असतात. चाहते तिच्या डान्ससोबतच तिच्या ग्लॅमरस लुकवर (Glamours look) फिदा आहेत. सध्या नोरा फतेहीचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल (viral on social media) होताना दिसत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 77 लाखाहून अधिक लोकांनी पाहिलं आहे.
नोरा फतेहीने या व्हिडिओच्या माध्यमातून वॅप चॅलेंज पूर्ण केलं आहे. तुम्ही पाहू शकता, नोरा यावेळी एका वेगळ्याच अंदाजात डान्स करताना दिसत आहे.
---------------------------
1) पोलिओ लसीकरणावेळी हलगर्जी, सॅनिटायजर पाजल्याने यवतमाळमध्ये 12 चिमुकले रुग्णालयात
2) Budget 2021 : आजच्या अर्थसंकल्पात कोणाला काय मिळालं? वाचा ठळक मुद्दे
3) सीतारामन यांनी त्यांचे भाषण ऐकणाऱ्यांचीच फसवणूक केली – चिदंबरम
------------------------------
या व्हिडिओमध्ये (viral on social media) नोराच्या आईची व्यक्तीरेखाही स्वतः नोराने साकारली आहे. नोराचा हा व्हिडिओ अनेक बॉलिवूड कलाकारांना आवडला आहे. नरगीस फाकरी आणि एली अवराम हे कलाकारही त्यांचं हास्य आवरू शकले नाहीत. त्यांनी कमेंट करून नोराच्या या व्हिडिओचं कौतुक केलं आहे.
नोरा फतेही 'छोड देंगे' या गाण्यात झळकणार आहे. या गाण्याचं टीजर नुकताच प्रदर्शीत झाला असून अनेक चाहत्यांनी या गाण्याचं कौतुक केलं आहे. नोरा फतेहीचा या गाण्यातला लुक आणि तिचा अभिनय चाहत्यांसाठी चर्चेचा विषय ठरला आहे. यापूर्वीही नोराने अनेकवेळा अल्बम गाण्यात आपल्या डान्सचा जलवा दाखवला आहे. त्यावेळी हे पूर्ण गाणं कधी प्रदर्शित होईल, यावरून चाहत्यांची उत्सुकता दाटली आहे.