nokia 5.4 mobileऑनलाइन टिम :

Nokia चा अलिकडेच लाँच (nokia mobile) झालेला जबरदस्त ‘बजेट’ स्मार्टफोन nokia 5.4 mobile आज पहिल्यांदाच सेलमध्ये खरेदी करण्याची संधी आहे. ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर आज दुपारी १२ वाजेपासून सेलला सुरूवात होत आहे. 6जीबीपर्यंत रॅम आणि 64जीबी इंटरनल स्टोरेज असलेल्या या फोनच्या खरेदीवर सेलमध्ये काही आकर्षक ऑफर्सही आहेत. Nokia 5.4 मध्ये क्वॉड कॅमेरा अर्थात चार कॅमेऱ्यांचा सेटअप आणि एक सेल्फी कॅमेरा म्हणजेच एकूण पाच कॅमेरे आहेत. सोबतच पंचहोल डिस्प्लेही आहे.

ऑफर :-

फ्लिपकार्टवरील सेलमध्ये हा फोन फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्डद्वारे खरेदी केल्यास 5 टक्के अनलिमिटेड कॅशबॅकचा फायदाल मिळेल. याशिवाय हा फोन 2 हजार 584 रुपये दरमहा नो-कॉस्ट ईएमआयवरही खरेदी करता येईल. तसेच, जुना फोन एक्स्चेंज केल्यास 14 हजार 850 रुपयांपर्यंत अतिरिक्त डिस्काउंटही मिळू शकतं. 

----------------------------

nokia 5.4 mobile स्पेसिफेकशन्स :

Nokia 5.4 फोनमध्ये ड्युअल सिमकार्डचा पर्याय असून अँड्रॉइड 10 चा सपोर्ट मिळेल. या फोनसाठी अँड्रॉइड 11 चाही सपोर्ट मिळेल. फोनमध्ये 6.39 इंचाचा HD+ डिस्प्ले असून क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 662 प्रोसेसर, 6 जीबीपर्यंत रॅम आणि 64 जीबीपर्यंत स्टोरेज मिळेल. मेमरी कार्डच्या मदतीने स्टोरेज 512 जीबीपर्यंत वाढवता येणंही शक्य आहे.

Nokia 5.4 कॅमेरा :

Nokia 5.4 मध्ये चार रिअर कॅमेरे आहेत. यात 48 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आहे. तर, अन्य लेन्स अनुक्रमे 5,2 आणि 2 मेगापिक्सेलचे आहेत. याशिवाय सेल्फीसाठी या फोनमध्ये 16 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेराही आहे. फ्रंट कॅमेरा पंचहोल स्टाइलमध्ये आहे. कनेक्टिव्हिटीसाठी या फोनमध्ये Wi-Fi, ब्लूटूथ 4.2, GPS/A-GPS, 3.5mm हेडफोन जॅक आणि युएसबी टाइप-सी पोर्ट आहे. फोनच्या बॅक पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर हे फिचरही मिळेल. तसेच फोनमध्ये 10W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट असलेली 4000mAh ची बॅटरीही मिळेल.

Nokia 5.4 भारतात किंमत :

Nokia 5.4 च्या 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेजची किंमत 13हजार 999 रुपये आहे. तर, 6 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 15 हजार 499 रुपये आहे. हा फोन डस्क आणि पोलर नाइट कलरमध्ये उपलब्ध असेल.