Nokia 5.4


ऑनलाइन टिम: 

नोकियाचे स्मार्टफोन (nokia smartphone) बनवणाऱ्या HMD ग्लोबलने दोन दिवसांपूर्वी भारतीय बाजारात आपले दोन नवीन स्मार्टफोन Nokia 5.4 आणि Nokia 3.4 लाँच केले. Nokia 5.4 आणि Nokia 3.4 हे दोन्ही बजेट स्मार्टफोन आहेत. यातील Nokia 5.4 मध्ये क्वॉड कॅमेरा अर्थात चार कॅमेऱ्यांचा सेटअप आहे. सोबतच पंचहोल डिस्प्लेही आहे.

Nokia 5.4 स्पेसिफेकशन्स :

Nokia 5.4 फोनमध्ये ड्युअल सिमकार्डचा पर्याय असून अँड्रॉइड 10 चा सपोर्ट मिळेल. या फोनसाठी अँड्रॉइड 11 चाही सपोर्ट मिळेल. फोनमध्ये 6.39 इंचाचा HD+ डिस्प्ले असून क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 662 प्रोसेसर, 6 जीबीपर्यंत रॅम आणि 64 जीबीपर्यंत स्टोरेज मिळेल. मेमरी कार्डच्या मदतीने स्टोरेज 512 जीबीपर्यंत वाढवता येणंही शक्य आहे.

------------------------------

Must Read

Nokia 5.4 कॅमेरा :

Nokia 5.4 मध्ये चार रिअर कॅमेरे आहेत. यात 48 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आहे. तर, अन्य लेन्स अनुक्रमे 5,2 आणि 2 मेगापिक्सेलचे आहेत. याशिवाय सेल्फीसाठी या फोनमध्ये 16 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेराही आहे. फ्रंट कॅमेरा पंचहोल स्टाइलमध्ये आहे. कनेक्टिव्हिटीसाठी या फोनमध्ये Wi-Fi, ब्लूटूथ 4.2, GPS/A-GPS, 3.5mm हेडफोन क आणि युएसबी टाइप-सी पोर्ट आहे. फोनच्या बॅक पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर हे फिचरही मिळेल. तसेच फोनमध्ये 10W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट असलेली 4000mAh ची बॅटरीही मिळेल.

Nokia 5.4 (nokia smartphone) भारतात किंमत :

Nokia 5.4 च्या 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेजची किंमत 13हजार 999 रुपये आहे. तर, 6 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 15 हजार 499 रुपये आहे. हा फोन डस्क आणि पोलर नाइट कलरमध्ये उपलब्ध असेल. 17 फेब्रुवारीपासून फ्लिपकार्ट आणि नोकियाच्या अधिकृत वेबसाइटवर फोनच्या विक्रीला सुरूवात होईल.