pooja suicide casecrime news- पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामध्ये (suicide) वनमंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे माजी पालकमंत्री संजय राठाेड यांच्यावर कारवाईसाठी सरकारवर विरोधकांचा दबाव वाढत चालला आहे. दरम्यान गुरूवारी पोहरादेवी येथे बंजारा समाजाच्या महंतांची बैठक पार पडली. यामध्ये संजय राठोड यांच्यावरील आरोप सिद्ध होत नाही तो पर्यत त्यांच्यावर कोणत्याही स्वरूपाची कारवाई करू नये अशी विनंती मुख्यमंत्र्यांना करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

या बैठकीत महंत बाबुसिंग महाराज, महंत कबीरदास महाराज, महंत संजय महाराज, महंत सुनील महाराज, महंत जितेंद्र महाराज, महंत शेखर महाराज , यवतमाळ जिल्ह्यातील ४ गावांसह वाशिम जिल्ह्यातील नायक कारभारी उपस्थित हाेते. सुरवातीला पाेहरादेवी येथील नंगारा वास्तु विकासासंदर्भात चर्चा करण्यात आली. त्यानंतर पूजा चव्हाण प्रकरणावर चर्चा झाली.

------------------------------

Must Read

1) पुन्हा लॉकडाऊन? पाहा कुठे काय बंद आणि काय सुरू राहणार; नवे नियम लागू

2) IPL Auction : कोणत्या संघानं कोणाला घेतलं विकत?

3) आरोग्यमंत्री राजेश टोपे कोरोनाच्या विळख्यात..!

------------------------------

पूजा चव्हाण आत्महत्या (suicide) प्रकरणात आतापर्यंत घडलेल्या घडामोडींवरून संजय राठोड यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न होताना दिसून येत आहे. त्यामुळे आरोप सिद्ध होत नाही तोपर्यँत त्यांच्यावर कोणत्याही स्वरुपाची कारवाई करू नये, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निर्णय घेण्यात आला. दरम्यान, यावेळी देवी सेवालाल ट्रस्टचे अध्यक्ष कबिरदास महाराज यांनी पूजा चव्हाण प्रकरणात महंत व बंजारा समाजाकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन पाठविणार सांगितले.