criticize to ajit pawar



politics news- भाजपाचे नेते नारायण राणे यांचे पुत्र आणि माजी खासदार निलेश राणे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.  राजकीय वर्तुळामध्ये सुरु असणाऱ्या चर्चांचा संदर्भ देत निलेश राणे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये  (politics) मोठी घडामोड होणार असल्याचे संकेत ट्विटवरुन (twitter) दिलेत.

निलेश राणे यांनी ट्विटरवरुन अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘अजित पवार यांना कधी मुख्यमंत्री होता आलं नाही आणि ते कधी होणार पण नाहीत,’ असा टोला निलेश यांनी लगावला आहे. तसेच ‘अजित पवार यांना कसंतरी उपमुख्यमंत्रीपद मिळालं होतं पण आता महाराष्ट्राला दोन उपमुख्यमंत्री मिळणार अशी चर्चा आहे,’ असंही निलेश यांनी ट्विटमध्ये (twitter) म्हटलं आहे. 



‘अजित पवार यांची परत नॉटरिचेबल होण्याची वेळ आलीय,’ असा उल्लेख करत निलेश यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीआधी आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर अजित पवार नॉटरिचेबल झाले होते हा जुना दाखला देण्याचा प्रयत्न केलाय. त्याचप्रमाणे निलेश यांनी आपल्या ट्विटमध्ये राज्यात सत्तेत असणाऱ्या महाविकास आघाडीमधील तिसरा पक्ष असणाऱ्या काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद मिळालं पाहिजे असंही म्हटलं असून उपमुख्यमंत्रीपद हा काँग्रेसचा हक्क असल्याचंही म्हटलं आहे.

--------------------------------
Must Read

1) आरोपावर धनंजय मुंडेंचा खुलासा, म्हणाले…

2) ग्राहकांना झटका! बजेट 2021 नंतर 25 रुपयांनी वधारल्या गॅसच्या किंमती

3) SBI मध्ये खातं असेल तर KYC साठी ही कागदपत्र आवश्यक

--------------------------------

अजित पवारांना कधी मुख्यमंत्री होता आले नाही व ते कधी होणार नाहीत पण कसंतरी उपमुख्यमंत्रीपद मिळालं होतं पण आता २ उपमुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळणार अशी चर्चा आहे म्हणजे अजित पवार यांची परत नॉटरिचेबल होण्याची वेळ आली. काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद मिळालच पाहिजे, तो त्यांचा अधिकार आहे.

जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपावरून विरोधकांकडून राष्ट्रवादी काँग्रेसला घेरण्याचे प्रयत्न विरोधी पक्षांनी केला होता. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात असतानाच निलेश राणे यांनी इतके गुन्हेगार मिळून एका जेलमध्ये नसतील तितके एका पक्षात आहेत असा टोला राष्ट्रवादीला लगावला होता. 

यावर अजित पवारांनी बोलताना निलेश राणेंच्या टीकेचा खरपूस समाचार घेतला होता. “ते काही बोलतात आणि त्यावर मी बोलायाचे का? पण एक सांगतो त्या निलेश राणेंच्या डोक्यावर परिणाम झालाय,” अशा शब्दांत अजित पवार यांनी निलेश राणेंवर निशाणा साधला होता.