ajit pawarreal clear politics-  भाजपचे प्रदेश सचिव आणि माजी खासदार निलेश राणेंनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार प्रहार केलाय. अजित पवार आपल्याला टोपी लावून गेले, त्या माणसाबद्दल बोलायला नको, असं म्हणत त्यांनी अजित पवारांवर हल्लाबोल केलाय. त्यांनी रत्नागिरीत माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधलाय, त्यावेळी अजित पवारांवर त्यांनी घणाघाती टीका (political criticism) केलीय.

आपल्या शपथविधीला येणारा माणूस, शपथविधीला येतो, उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतो. आमदार टिकत नव्हते म्हणून हात जोडून परत निघून जातो, त्याच्यासोबतच्या आमदारांना चोरासारखे धरून शरद पवार साहेबांसोबत उभं केलं जाते, तोच माणूस भाजपावर टीका करतो आणि आपण सहन करायची का, असा सवाल उपस्थित करत माजी खासदार निलेश राणेंनी अजित पवारांवर निशाणा साधलाय.

-------------------------------------

Must Read

1) इचलकरंजीत तलवार व चाकूघेऊन फिरणार्‍यांना अटक

2) सांगली- सतत पैशांसाठी त्रास देत असल्याने केला खून

3) सांगली- मराठा नेत्यांना फिरू देणार नाही

-------------------------------------

भाजपचे प्रदेश सचिव आणि माजी खासदार निलेश राणेंनी राष्ट्रवादीवर निशाणा साधलाय. धनंजय मुंडेंचे नाव न घेता निलेश राणेंनी मुंडेंना लक्ष्य केलं. प्रॉपर्टी लपवणारे बायका लपवणारे सुसंस्कृत का, असा टोला निलेश राणेंनी धनंजय मुंडेंना लगावलाय. फणडवीस शपथविधीच्या पहाटे काय घडलं ते अजून सांगत नाहीयेत, जर सांगितलं तर अजित पवार बारामतीतसुद्धा फिरू शकणार नाही, असं सांगत निलेश राणेंनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीकास्त्र सोडलंय.

सुशांत सिंह राजपूत (sushant singh rajput) प्रकरणावरून भाजप प्रदेश सचिव आणि माजी खासदार निलेश राणेंनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल केलाय. सुप्रीम कोर्टामध्ये आदित्य ठाकरेंचे नाव घेतले, मग आम्ही काय बोलायचे नाही, तुम्ही खून करा, तुम्ही नाईट किंग आहात ना मग रात्री मर्डर करा, यांना काय लायन्सस आहे का? (political criticism), सुशांत सिंग प्रकरणातले सीडीआर रिपोर्ट, सीसीटीव्ही कुठे गेले, असा सवाल निलेश राणेंनी उपस्थित केलाय. (real clear politics)

मुंबईच्या महापालिकेच्या कोरोना काळातील ठेक्यावरून माजी खासदार निलेश राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय. महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिलेल्या कॉन्ट्रॅक्ट संदर्भात आशिष शेलारांनी सभागृहात विषय मांडलाय. पण सॅनिटायझर आणि मास्क बनवण्याचा ठेका हा फिल्म इंडस्ट्रीमधल्या हौसे गौशांना दिला गेलाय. आदित्य ठाकरे यांचे नाव न घेता निलेश राणेंनी यांनी टीका केलीय.