राज्यातील करोनाचा संसर्ग पुन्हा एकदा झपाट्याने वाढत आहे. मुंबई, पुणे, नाशिक या प्रमुख शहरांसह विदर्भातील शहरांमध्येही दररोज करोनाचे (Covid-19) मोठ्यासंख्येने रुग्ण आढळून येत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा लॉकडाउन सुरू होतो की काय अशी भीती सर्वसामान्यांच्या मनात आहे. दरम्यान, नाशिकमध्ये उद्यापासून रात्री ११ ते पहाटे ५ या वेळेत संचारबंदीची घोषणा आज(रविवार) पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केली . करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रशासनाने हा निर्णय घेतला असल्याचं त्यांनी पत्रकारपरिषदेत बोलताना सांगितलं आहे. तसेच, लॉकडाउनचा (Lockdown) निर्णय हा पूर्णपणे नागरिकांच्या हातात असल्याचंही त्यांनी सांगितलेलं आहे.
करोनाचा धोका वाढतोय त्यामुळं नियमांचं पालन करा, मास्क न वापरल्यास १ हजार रुपये दंड भरावा लागणार, आठ दिवसांत स्थिती नियंत्रणात आली नाही तर कडक निर्णय घ्यावे लागतील. असा इशारा छगन भुजबळ यांनी दिला आहे.राज्यात करोनाची (Covid-19) रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे.त्यामुळे अनेक जिल्ह्यात लॉकडाऊनचे निर्णय घेण्यात येत आहे.नाशिक जिल्ह्यात आपण अद्याप निर्णय घेतलेला नाही. लॉकडाऊन करणे नागरिकांना आणि शासनाला देखील परवडणारे नाही. मात्र रुग्णसंख्या वाढत राहिली तर मात्र यावर पुनर्विचार करून निर्णय घ्यावा लागणार आहे. लॉकडाउनचा (Lockdown) निर्णय हा पूर्णपणे नागरिकांच्या हातात आहे.
-----------------------------
Must Read
1) पुन्हा लॉकडाऊन? पाहा कुठे काय बंद आणि काय सुरू राहणार; नवे नियम लागू
2) IPL Auction : कोणत्या संघानं कोणाला घेतलं विकत?
3) आरोग्यमंत्री राजेश टोपे कोरोनाच्या विळख्यात..!
------------------------------
जर नागरिकांनी करोनाच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन केले. मास्क आणि सॅनिटायजरचा वापर नियमित केला तरच हे शक्य आहे. अन्यथा शासनाला याचा पुनर्विचार करावा लागेल. असं छगन भुजबळ यांनी या अगोदरच सांगितलेलं आहे.तसेच, नाशिक जिल्ह्यात साधरणपणे ६९ हजार सरकारी कर्मचाऱ्यांना लस देण्याचं ठरवण्यात आलं होतं. ६९ हजार पैकी ४० हजार जणांनी आतापर्यंत ती लस घेतलेली आहे. आमच्याकडे त्या लसींचा साठा आहे, आमची सर्व कर्मचाऱ्यांना विनंती आहे की, २८ फेब्रुवारीपर्यंत तुम्ही लस घेतली पाहिजे. असंही छगन भुजबळ यांनी यावेळी सांगितलं.