corona virus


महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा (Coronavirus) प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. अलीकडच्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत सुमारे 29 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे पुढील 15 दिवस मुंबईसाठी खूप महत्त्वाचे असतील, असा इशारा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिला आहे. नागरिकांवर निर्बंध (social distancing) आणण्यासाठी मुंबई प्रशासनानेही कंबर कसली आहे.

तर दुसरीकडे नागपुरमध्ये पून्हा एकदा निर्बंध वाढवण्यात येत आहेत. याठिकाणी 50 टक्के क्षमतेनं हॉटेल्स चालवण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच अंत्यसंस्कारांच्या कार्यक्रमांत जास्तीत जास्त 20 लोकांना परवानगी देण्यात आली आहे. 20 पेक्षा अधिक लोकं उपस्थितीत राहिल्यास दंडात्मक कारवाई करण्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

------------------------------

Must Read

1) पुन्हा लॉकडाऊन? पाहा कुठे काय बंद आणि काय सुरू राहणार; नवे नियम लागू

2) IPL Auction : कोणत्या संघानं कोणाला घेतलं विकत?

3) आरोग्यमंत्री राजेश टोपे कोरोनाच्या विळख्यात..!

------------------------------

राज्य सरकारच्या आकडेवारीनुसार, 12 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रात 31 हजार 479 इतके अॅक्टीव्ह कोरोना रुग्ण होते. तर गुरुवारी हा आकडा वाढून 43 हजार 701 वर पोहचला आहे. त्यामुळे राज्याच्या चिंता वाढल्या आहेत.  मुंबईत कोव्हिड रुग्ण वाढीमध्ये तब्बल 37 टक्क्यांनी वाढ झाली आहे. शुक्रवारी शहरात एकूण 823 नवीन रुग्ण आढळले आहेत. डिसेंबरनंतर प्रथमचं एवढी मोठी वाढ झाली आहे. मुंबईत आतापर्यंत कोरोना विषाणूचे 3 लाख 17 हजार 310 रुग्ण आढळले आहेत. यामध्ये 11 हजार 435 रूग्णांना आपला प्राण गमावावा लागला आहे.

त्यामुळे येत्या 15 दिवसांत कोरोना रुग्णांमध्ये आणखी वाढ होईल, अशी शक्यता (social distancing) वर्तवण्यात आली आहे. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश ककानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना रुग्णांमध्ये वाढीचं कारण शोधण्यासाठी पुढील दोन आठवडे खूप महत्त्वाचे आहेत. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत 700 हून अधिक रुग्ण आढळले आहेत.

आठवड्याच्या सुरूवातीला हा आकडा 500 च्या खाली होता. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागातील तापमानात घट झाली आहे. कोरोना रुग्णांच्या वाढीमागे हे कारण असू शकतं, अशी माहिती वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांने दिली आहे. तसेच, कोव्हिड विषाणूच्या सुरक्षा नियमांचं पालन न केल्याने कोरोना विषाणूच्या रुग्णांत वाढ झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.