new corona patients in Kolhapur


ऑनलाइन टिम :

कोल्हापूर जिल्ह्यात रविवारी गेल्या 24 तासांत 14 नवे रूग्ण दिसून आले, त्यात शहरातील 8 रूग्णांचा समावेश आहे. दिवसभरात चौघेजण कोरोनामुक्त (Corona free) झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनील माळी यांनी दिली.जिल्ह्यात कोरोना मृत्यू नोंद निरंक राहिली. त्यामुळे कोरोना (Covid) बळींची संख्या 1729 आहे. रविवारी 14 नवे रूग्ण मिळाले. दिवसभरात 210 जणांची तपासणी केली. चौघे कोरोनामुक्त झाल्याने कोरोनामुक्तांची संख्या 48 हजार 229 झाली आहे. शेंडा पार्क येथील लॅबमधून 695 रिपोर्ट (Report) आले. त्यातील 673 निगेटिव्ह आहेत. ऍटिजेंन  (Antigen) टेस्टचे 36 रिपोर्ट आले.

---------------------------

त्यातील 35 निगेटिव्ह आहेत. ट्रनेटचे 106 रिपोर्ट आले, त्यापैकी 98 निगेटिव्ह आहेत. गेल्या 24 तासांत आजरा 0, भुदरगड 0, चंदगड 0, गडहिंग्लज 2, गगनबावडा 0, हातकणंगले 1, कागल 0, करवीर 0, पन्हाळा 0, राधानगरी 0, शाहूवाडी 1, शिरोळ 0, नगरपालिका क्षेत्रात 2, कोल्हापूर शहर 8 व अन्य 0 असे 14 रूग्ण आहेत. नव्या 14 रूग्णांमुळे (Covid) पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 50 हजार 99 झाली आहे. चौघे कोरोनामुक्त (Corona free) झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माळी यांनी दिली जिल्ह्यात 14 नवे रूग्ण, 4 कोरोनामुक्त,पॉझिटिव्ह रूग्ण 14, कोरोनामुक्त 4, कोरोना मृत्यू  (Death) 0 आजपर्यतचे कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण ः 50 हजार 099 आजपर्यतचे कोरोनामुक्त रूग्ण ः 48 हजार 229 सध्या उपचार घेत असलेले कोरोना रूग्ण ः 141 आजपर्यतचे एकूण कोरोना बळी ः 1729 गेल्या 24 तासांत 210 संशयितांची तपासणी