arjun tendulakarऑनलाइन टीम- 

sports news- इंडियन प्रिमियर लीग म्हणजेच आयपीएलच्या (IPL) १४ व्या पर्वातील खेळाडूंचा लिलाव गुरुवारी चेन्नईमध्ये पार पडला. या लिलावामध्ये अनेक खेळाडूंना अनपेक्षितपणे अधिक किंमतीला विकत घेण्यात आलं तर काही चांगल्या खेळाडूंना म्हणावी तशी बोली संघ मालकांनी लावली आहे. याच लिलावामध्ये एक खास नाव सर्वाधिक चर्चेत राहिलं ते म्हणजे अर्जुन तेंडुलकर (nepotism). 

लिलावात सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याला अपेक्षेप्रमाणे मुंबई इंडियन्सने विकत घेतलं. २० लाखांच्या बेस प्राइजला अर्जुनला मुंबईने आपल्या संघात घेतलं आहे. मात्र अर्जुनला मुंबई इंडियन्सने विकत घेतल्यानंतर इंटरनेटवर पुन्हा एकदा घराणेशाहीची (nepotism)चर्चा सुरु झाली आहे. (sports news)

------------------------------

Must Read

1) पुन्हा लॉकडाऊन? पाहा कुठे काय बंद आणि काय सुरू राहणार; नवे नियम लागू

2) IPL Auction : कोणत्या संघानं कोणाला घेतलं विकत?

3) आरोग्यमंत्री राजेश टोपे कोरोनाच्या विळख्यात..!

------------------------------

मुंबई इंडियन्सनेही विशेष व्हिडीओ आणि पोस्ट शेअर करत अर्जुनचं संघामध्ये स्वागत केलं आहे. त्याच्या रक्तातच क्रिकेट आहे असं मुंबई इंडियन्सने म्हटलं आहे.

मात्र अर्जुनला अपेक्षेप्रमाणे मुंबईच्या संघानेच विकत घेतल्याने अनेकांनी या निर्णयावरुन घराणेशाहीच्या मुद्द्याला हात घातला आहे. अर्जुनला मुंबईने विकत घेणं म्हणजे नेपोटिझम नाही का असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केलाय. सोशल नेटवर्किंगवर यासंदर्भात जोरदार चर्चा असून यावरुन गंभीर टीकेबरोबरच मिम्सची व्हायरल होत आहेत. अनेकांना तर एकाच सामन्यात हजार धावा करणाऱ्या प्रणव धनावडेचेही आठवण झाल्याचे सोशल नेटवर्किंगवर पहायला मिळत आहे.