criticize to chandrakant patilऑनलाइन टिम :

politics news of india- भाजप  (political party) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. एका महिला लोकप्रतिनिधीने तयार केलेल्या सुरक्षित मतदारसंघात जाऊन, त्या महिलेला बाजूला सारुन मतदारसंघ ताब्यात घेणे हा पुरुषार्थ आहे का? असा सवाल विचारत जयंत पाटील यांनी टोला लगावला आहे. 

चंद्रकांतदादा म्हणजे आयत्या बिळावर नागोबा असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. तसेच चंद्रकांतदादांनी स्वत:चं बघावे शरद पवार यांची माप काढू नयेत, असा सल्लाच जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटलांना दिला आहे.

---------------------------

ज्यांना आपल गाव सोडून दुसरीकडे राहायला जावे लागते, त्यांच्याबद्दल मी कशाला बोलू, अशा शब्दात शरद पवार यांनी रविवारी चंद्रकांत पाटलांना टोला लगावला होता. महत्वाच्या लोकांबद्दल मी काय बोलावे असेही पवार म्हणाले होते. त्यावर चंद्रकांत पाटील यांनीही पवारांवर खोचक टीका केली.  (politics news of india)

माढ्यातून लोकसभेची निवडणूक लढवण्याचे जाहीर करुन नंतर तो निर्णय मागे घेणाऱ्या शरद पवारांनी मला शिकवू नये, अशा शब्दात चंद्रकांतदादांनी पवारांना टोला लगावला होता. त्यानंतर जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटलावर जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.