sharad pawarऑनलाइन टिम :

politics news-  केरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीला काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. आमदार मणी सी कप्पन यांनी रविवारी राष्ट्रवादीला (political party) सोडचिठ्ठी देऊन शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर राष्ट्रवादीने कप्पन यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत दिले होते. त्यानुसार, आमदार कप्पन यांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी करण्यात येत असल्याचे पत्र पक्षाने जारी केले आहे. 

पक्षविरोधी कार्यवाही केल्यामुळे, पक्षाचे प्रमुख सर्वेसर्वा शरद पवार यांच्या आदेशानुसार ही कारवाई केल्याचे पत्रात म्हटले आहे. पक्षाचे कार्यकारी समितीचे सदस्य आणि कायम सचिव असलेल्या एस.आर. कोहली यांनी हे पत्र जारी केले आहे.

--------------------------

केरळमधील पालाचे राष्ट्रवादीचे आमदार कप्पन यांनी पक्षांतर केल्यानंतर हा तर पाला मतदरांसघातील मतदारांचा विश्वासघात असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे (political party) केरळचे परिवहन मंत्री ए. के. शशीद्रन यांनी दिली. तसेच कप्पन यांच्याविरोधात राष्ट्रवादी पक्षाकडून शिस्तभंगाची कारवाई करणार असल्याचेही त्यांनी म्हटले होते. गेल्या महिनाभरापासून मनी कपन्न यांनी यूडीएफमध्ये प्रेवशाचे प्रयत्न सुरू केले होते.  (politics news)

अखेर रविवारी आमदार कप्पन यांनी काँग्रेसचे नेते रमेश चेन्निथला यांच्या उपस्थितीत कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसच्या नेतृत्ताखाली ऐश्वर्य केरळा या रॅलीचे आयोजन केले होते. ती संवाद यात्रा ज्यावेळी पाला मतदारसंघात पोहोचली त्यावेळी आमदार कप्पन यांनी आपल्या समर्थकांसह काँग्रेसप्रणित यूडीएफमध्ये प्रवेश केला.